लोणीकंद पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला हस्तगत…

पुणे (संदीप कद्रे): लोणीकंद पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करुन ७ लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

लोणीकंद पोलिस ठाणे हददीतील वाडेबोल्हाई येथे राहणारे फिर्यादी यांचे राहते घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून फिर्यादीचे १३ तोळे सोन्याचे दागिन्यांची दिवसा घरफोडी केल्याची घटना ११/०७/२०२३ रोजी घडली होती. लोणीकंद पोलिस स्टेशन येथे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर ५६१/२०२३, भादंवि कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नमुद गुन्हयातील फिर्यादीची परिस्थिती अंत्यत हलाखीची असल्याने व चोरीस गेलेली मालमत्तेमुळे त्यांना बसलेला प्रचंड मानसिक धक्का पाहुन लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी तात्काळ तपासी पथक अधिकारी सपोनि गोडसे, सपोनि जाधव यांचे नेतृत्वाखाली दोन तपास पथके तयार करुन सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरीता सुचना दिल्या. त्यानुसार सदर गुन्हयाच्या तपासाचे अनुषंगाने दोन्ही पथके शिक्रापूर व दौंड भागात रवाना झाले. परंतु आत्यंतिक परिश्रम करुनही काहीही हाती आले नाही. त्यानंतर मागील काळात जेलमधुन सुटलेल्या आरोपीं विषयी माहीती घेण्याचे काम सुरु करण्यात आले. सदरची माहीती घेत असताना तपास पथकातील पोलिस शिपाई साईनाथ रोकडे, सचिन चव्हाण, दिपक कोकरे यांनी जेल रिलीज झालेल्या आरोपींची माहीती घेतली परंतु त्या काळात कोणी लोणीकंद परीसरात आल्याची खात्रीशिर माहीती मिळाली नाही. तरीही खचुन न जाता दोन्ही पथकाने आपले काम चालुच ठेवले.

सपोनि श्री रविंद्र गोडसे, पोलिस हवालदार सकाटे, पोलिस शिपाई साईनाथ रोकडे, सचिन चव्हाण, दिपक कोकरे यांना माहीती मिळाली की, पिंपरी परिसरातील एक दिवसा घरफोडया करणारा आरोपी नुकताच सुटला आहे. त्यानुसार त्याच्या हालचाली विषयी गोपनीय खबऱ्याकडुन माहीती घेतली असता तो लोणीकंद परीसरात येवुन गेल्याचे समजले. त्यावरुन सदर आरोपीचा ठाव-ठिकाणाची माहीती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला परंतु तो त्याचे घरी राहत नव्हता व त्याचा नक्की असा ठावठिकाणा नव्हता. त्यामुळे त्याला पकडणे जिकरीचे झाले होते. परंतु त्याचे जुने राहण्याचे अड्डे व त्याचेवर नाराज असलेले दुश्मन यांचेकडे त्याचेविषयी माहीती मिळवुन त्याला शिताफीने नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. सुरवातीला त्याने सदरचे गुन्हयाविषयी काहीही माहीती दिली नव्हती. परंतु पोलिस भाषेत त्याला विचारणा केल्यावर त्याने सदर घरफोडी केल्याची कबुली दिली व साथीदारांची नावे सांगीतली.

सदर गुन्हयातील सोने त्याने कशा पध्दतीने खपविले या विषयी माहीती दिली. त्यानुसार सपोनि श्री. गोडसे व त्यांचे पथकाने पुढील तपास करीत आणखी एका आरोपीस अटक केले असून चोरीस गेलेल्या संपुर्ण सोन्याची लगड तपासकामी जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपींची तब्बल ०८ दिवस पोलिस कस्टडी घेण्यात आली असून गुन्हयात चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिन्यांची आरोपीकडुन १३ तोळे सोन्याची लगड असा एकुण ७ लाख रुपये किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. न्यायालयाचे आदेशाने फिर्यादी यांना नमुद मालमत्ता देण्यात येणार आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास सपोनि गोडसे करीत आहेत.

सदरची कामगिरी रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, शशीकांत बोराटे, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर, संजय पाटील, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शह यांचे मार्गदर्शना खाली विश्वजीत काइंगडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस ठाणे, पुणे शहर, मारुती पाटील सो, पोलिस निरीक्षक (गुन्हे), लोणीकंद पोलिस ठाणे, पुणे शहर, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलिस नाईक विनायक साळवे, सागर जगताप, पोलिस शिपाई साईनाथ रोकडे, सचिन चव्हाण, दिपक कोकरे, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, शुभम चिनके, आशिष लोहार, गणेश डोंगरे, महिला पोलिस शिपाई प्रतिक्षा पानसरे लोणीकंद पोलिस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; रात्रीत 159 गुन्हेगारांना अटक…

पुणे-नगर महामार्गावरून गुन्हे शाखा युनिट ६ ने दोघांना ताब्यात घेतले अन्…

पुणे शहरात गस्त दरम्यान पकडलेला निघाला उस्मानाबाद आरोपी…

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून…

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!