
नवऱ्याच्या दोन मित्रांनी महिलेच्या इच्छेविरुद्ध ठेवले अनैसर्गिक शरीरसंबंध…
पुणे : पुणे शहरातील हडपसर भागात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पतीनचे पत्नीला वेश्याव्यवसायाला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पतीला आणि पतीच्या दोन मित्रांना अटक केली आहे.
या प्रकरणी 25 वर्षाच्या पत्नीने आपल्या पतीने केलेल्या या कृत्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी पतीसह त्याचे दोन मित्र आदित्य गौतम (रा. कसबा पेठ) आणि सुजित पुजारी (रा. आंबेगाव) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने पैशाच्या हव्यासापोटी पत्नीला मारहाण करून उंड्री हांडेवाडी रस्त्यावर उभे करत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले होते. आपल्या दोन मित्रांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेत पत्नीला त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास बळजबरी केली होती. पतीच्या मित्रांनी तिच्यासोबत इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले. डिसेंबर 2020 पासून हा संपूर्ण प्रकार सुरू होता.
काही दिवसांपूर्वी ही महिला रास्ता पेठ परिसरातून जात असताना तिच्या पतीच्या मित्रांनी तिचा रस्ता अडवला होता. तिला जातीवाचक शिवीगाळ केली होती. आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर महिलेने घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांत पती आणि त्याच्या दोन्ही मित्रांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी लगेच कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पतीसमोरच पत्नीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खाजगी सावकाराने त्या व्यक्तीला समोर बसवून त्याच्या बायकोवर बलात्कार केला होता. शिवाय, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तयार करुन हा व्हिडीओ आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हडपसर परिसरात फेब्रुवारी 2023 मध्ये ही घटना घडली होती. 34 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी इम्तियाज हसीन शेख (वय 47 वर्षे) याच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली होती.
पुणे शहरात पत्नीची हत्या करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण…
पुणे शहरातील महिलेच्या पतीचे कोरोनात निधन, अल्पवयीन युवकासोबत शरीरसंबंध अन्…
पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…
पुणे जिल्हा हादरला! पित्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
धक्कादायक! सावकाराने पतीसमोरच पत्नीवर केला बलात्कार…
नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार; सात महिन्यांची गर्भवती…