धक्कादायक! नवरा यूट्यूब पाहून करत होता पत्नीची घरीच प्रसूती अन् पुढे…
चेन्नई (तमिळनाडू): एका नवऱ्याने यूट्यूब पाहून घरीच पत्नीची घरीच प्रसूती करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान महिलेला खूप रक्तस्त्राव झाला आणि त्यामध्ये तिला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना 22 ऑगस्ट रोजी कृष्णगिरी जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी रथिका यांनी सांगितले की, पोचमपल्लीजवळील पुलियामपट्टी येथील रहिवासी लोगनायकी (वय 27) नावाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिलेला प्रसूती वेदना सुरू असताना लोगनायकी हिचा पती मधेश यानी घरी नैसर्गिक प्रसूतीचा प्रयत्न केला. महिलेने मुलाला जन्म दिला. पण, गर्भनाळ योग्यरित्या कापली न गेल्यामुळे जास्त रक्तस्त्राव झाला आणि महिला बेशुद्ध झाली.
महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी सीआरपीसी कलम 174 (अनैसर्गिक मृत्यू) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘प्राथमिक तपासात पतीने यूट्यूब पाहून डिलिव्हरी केल्याची बाब समोर आली आहे. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतर स्थिती स्पष्ट होईल. तपासात पोलिसांना पुरावे मिळाल्यास आरोपी पतीला अटक होऊ शकते.’
नवऱ्याने यूट्यूबवर होम डिलिव्हरीची माहिती गोळा केली होती. पण, अपूर्ण माहितीमुळे प्रसूती यशस्वी होऊ शकली नाही आणि महिलेला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. एका आरोग्य कर्मचाऱ्याने माहिती दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
NEET मधील अपयश! मुलाच्या आत्मत्येनंतर वडिलांनी घेतला जगाचा निरोप…
हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक…
लॉकडाऊनमधील प्रेमसंबंधाचा तिहेरी खुनाने झाला शेवट अन्…
धक्कादायक! वरिष्ठ IPS अधिकारी विजयकुमार यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…