नाशिक पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची काढली वरात…

नाशिक: नाशिक शहरामधील दिंडोरी रोडवरील वज्रेश्वरी पाटाजवळ दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातामध्ये लाकडी दांडके, कोयते घेऊन वाहनांची तोडफोड करणाऱ्या संशयितांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्या संशयितांची वरात काढली.

वज्रेश्वरी पाटाजवळ, दिंडोरीरोड, नाशिक येथे रिक्षामध्ये तक्रारदार सागर शांतीलाल फुलमाळी हे बसलेले असताना दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने लामखेडे मळ्याकडून एक इनोव्हा गाडी जोरात रिक्षाजवळ येऊन इनोव्हा कारमधून 5 ते 6 टवाळखोर हातात लाकडी दांडके, कोयते घेऊन खाली उतरले. या अनोळखींनी तक्रारदार रिक्षात बसलेला असताना रिक्षाची समोरील काच फोडून, पाठीमागील बाजूच्या हुडवर, डाव्या बाजूस व उजव्या बाजूने कोयत्याने व दांडक्याने वार केले. तसेच रिक्षाच्या बाजूला असलेल्या इको गाडीच्या सर्व काचा फोडल्या. आयशर टेम्पोची समोरील काच फोडली, अॅपेरिक्षाची काच फोडली. अ‍ॅक्टिव्हा गाडीवर लाकडी दांड्याने मारून नुकसान केले. शिवाय, कुमावतनगर येथील रिक्षाचेदेखील नुकसान केले होते.

पोलिस अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

याबाबत तक्रारदार सागर शांतीलाल फुलमाळी यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पंचवटी पोलिसांनी गौरव एकनाथ थोरात (वय 19), प्रतीक अनिल दोबाडे (वय 21) यांना अटक केली. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांचे साथीदार नितेश प्रल्हाद राऊत, चेतन भिकाजी गायकवाड, अविनाश प्रल्हाद राऊत यांना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात एका विधी संघर्षित बालकाचा देखील सहभाग निष्पन्न झाले आहे. त्यास ताब्यात घेऊन बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, दिंडोरी रोडवरील माजी नगरसेवक उत्तमराव उगले यांच्या घराजवळ घडला होता. दहशत निर्माण करण्याच्या दृष्टीने अज्ञात युवकांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. पंचवटी पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या अन् पेठरोड दत्तनगर परिसरात त्यांची वरात काढली होती.

संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा दुचाकीस्वारांना दणका…

नाशिकमध्ये माजी नगरसेविकेच्या पतीसह दोघांवर जीवघेणा हल्ला…

नाशिकमध्ये सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळालं भलं मोठं घबाड….

नाशिक! गंगापूर पोलिसांनी दुचाकीचा गुन्हा 24 तासात केला उघड…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!