पोलिसकाका Video News: १८ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…
‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह! पुणे शहरात राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाने दोघांना उडवले
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड याने दारू पिऊन अपघात केला आहे. ड्रिंक ऍण्ड ड्राईव्हच्या या घटनेत टेम्पोचा चालक आणि क्लिनर जखमी झाले आहेत, त्याचबरोबर सौरभ गायकवाडही जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील रिलस्टार युवतीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू
रायगड : रायगड जिल्ह्याच्या माणगाव कुंभे येथील जलविद्युत प्रकल्प परिसरात फिरायला गेलेल्या युवतीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू झाला आहे. अन्वी संजय कामदार (वय 27, रा. माटुंगा) असे मृत युवतीचे नाव असून, ती रिलस्टार होती.
नागपूरमध्ये धावत्या कारमध्ये प्रेमीयुगलाचे अश्लील चाळे
नागपूर : नागपूरमध्ये एका धावत्या कारमध्ये प्रेमीयुगलाचे धोकादायक पद्धतीने अश्लील चाळे सुरू होते. रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ काढला होता. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
पुणे पोर्शे अपघात! निबंध लिहायची शिक्षा देणाऱ्यांविरोधात कारवाई होणार
पुणेः पुणे पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देत जामीन देणाऱ्या बालन्याय मंडळाच्या दोन सदस्यांविरोधात कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
पंढरपूरहून घरी परतणाऱ्या वारकऱ्यावर काळाचा घाला
हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातून पंढरपूरला गेलेल्या वृद्ध वारकऱ्याचा गावी परत येताना एसटी बसमध्ये मृत्यू झाला आहे. रामराव रहाटे (वय ६०, रा. गोंडाळा) असे मृत वारकऱ्याचे नाव आहे. ते आषाढी वारीसाठी पायी दिंडीमध्ये पंढरपूरला गेले होते.
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; 12 माओवाद्यांना कंठस्नान
गडचिरोली: गडचिरोली सीमाभागात पोलीस माओवादी यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाला असून 12 माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. 12 माओवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या जवानांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 51 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
भोंदूबाबाने केला महिलेवर बलात्कार
भोपाळ (मध्य प्रदेश): ग्वाल्हेरजवळील उटीला गावात एका भोंदू बाबाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला भोंदू बाबाकडे पतीचं दारुचं व्यसन सुटावं यासाठी गेली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रेयसीच्या घरात घुसून प्रियकराने केली तिघांची हत्या
पाटणाः बिहारमध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या घरामध्ये घुसून तिच्या कुटुंबातील तीन सदस्यांची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली आहे. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी प्रियकरासह दोघांना अटक केली आहे.
चित्रपटाच्या सेटवर 20 फूटांवरून कोसळून स्टंटमनचा मृत्यू
चेन्नई: तमिळनाडूत चित्रपटाच्या सेटवर स्टंट दरम्यान 20 फूटांवरून कोसळून स्टंटमॅनचा मृत्यू झाला आहे. एलुमलाई असे मृत्यू झालेल्या स्टंटमॅनचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कर्नाटकमध्ये घराला बाहेर कुलूप लावून पेटवले
कर्नाटकमध्ये घराला बाहेर कुलूप लावून पेट्रोल टाकून पेटवून दिले. घरात झोपेत असलेल्या आई आणि मुलीचा जळून मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…