
राज्यात गाजलेल्या प्रकरणातून किशोर दर्डा आरोपमुक्त…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्ह्यासह महाराष्ट्रात गाजलेल्या यवतमाळ पब्लिक स्कूल मधील दोन मुलींवर अत्याचार केल्या प्रकरणी संशयीत आरोपी अमोल अरुण क्षिरसागर, यश निलमचंद बोरुंदीया व जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेचे सचिव किशोर सुरेशचंद्र दर्डा (वय 57) आदीं विरुद्ध वडगांव रोड पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक 480/2016 भादंवि कलम 354, 354 (A), 323, 376 (2) (F) व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 6, 8, 10, 12, 21 तसेच संरक्षण कायदा 75 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली. वडगांव रोड पोलिसांनी 13 सप्टेंबर 2016 रोजी यवतमाळ येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरण प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चालू शकत नसल्याने तदनंतर जिल्हा व सत्र न्यायालयात सदर प्रकरण वर्ग करण्यात आले.
यवतमाळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डब्ल्यु. चव्हाण यांच्या न्यायालयात सदर खटला चालला. सदर प्रकरणात एकुण 12 साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात संशयीत आरोपी अमोल क्षिरसागर, यश बोरुंदीया यांना 29 एप्रिल 2023 रोजी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. तत्पूर्वी जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेचे सचिव किशोर सुरेशचंद्र दर्डा यांनी सुरवातीला जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपातून मुक्त करण्यासाठी फौजदारी पुनर्विलोकन अर्ज दाखल केला. मात्र, तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. वरील प्रकरणात दोन्ही आरोपींतर्फे यवतमाळचे फौजदारी वकील ॲड. राजेश साबळे यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. सगीर दुंगे, ॲड. स्वराज साबळे यांनी सहकार्य केले.
दरम्यान, जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी अर्ज (APL) Nos. 295, 296 all of 2017 दाखल केला. सदर प्रकरणात संशयीत आरोपी किशोर दर्डा (वय 57) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगीती दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे यांच्या एकल खंडपीठात सदर प्रकरण सन 2023 रोजी सुनावनीस आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल तिन्ही फौजदारी अर्ज क्रमांक (APL) Nos. 295/2017, 296/2017 व 297/2017 (तसनीम जाफरअली रत्नमवाला वय 47) एकत्र सुनावणी करण्यात आली. सदर प्रकरणात फौजदारी अर्ज क्रमांक 295, 296 व 297 all of 2017 उच्च न्यायालयाने मंजुर केले. जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांना बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 21 व संरक्षण कायदा 75 अंतर्गत आरोपमुक्त करण्यात आले.
सदर प्रकरणात याचिकाकर्ते किशोर दर्डा यांचेतर्फे उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील ॲड. फिरदोस मिर्झा यांनी युक्तिवाद केला. तर सरकारची बाजू अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड. एम. एच. देशमुख यांनी मांडली. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शर्मा यांनी संशयीत आरोपी जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांना आरोपमुक्त केले आहे. सदर प्रकरण राज्यात गाजले होते.
यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल…
यवतमाळ जिल्ह्यात दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू…
यवतमाळ जिल्ह्यातील विधवा महिलेवर पुण्यात बलात्कार; गुन्हा दाखल…
… ‘त्या’ आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल!
घाटंजी येथे फौजदारी न्यायालयातील लोक अदालतीत 169 प्रकरण निकाली…

