खडकी पोलिसांनी दोन महिलांना केली अटक; मुद्देमाल हस्तगत…

पुणे (संदिप कद्रे): अवैद्य रित्या गांज्या विक्री करणाऱ्या ०२ महिलांना खडकी पोलिसांनी जेरबंद केले असून, २,२१,१३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अंमली पदार्थ मुक्त पुणे अभियानाच्या अनुषंगाने ०८/०२/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी कारवाई व अवैद्य धंदे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी १७.३० वा. चे सुमारास तपास पथकाचे अधिकारी पो.उप.नि. गुंजाळ, तपास पथकातील अंमलदार पो.शि.९९३७ भोसले यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काही महीला व पुरुष असे मिळून पाटील ईस्टेट ब्रिजखाली, हॉटेल अलकुरेश जवळ, शिवाजीनगर, पुणे येथे गांजा या अंमली पदार्थाची विक्री करीत आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.नि. दिघावकर सो व म.स.पो.नि. श्वेता बेल्हेकर, पो.ना.७३५६ निकाळजे, म.पो.शि.७९७८ शिंदे, म.पो.शि.९७२६ म्हस्के व तपासपथक स्टाफ असे बातमी प्रमाणे पोलिस ठाणे हद्दीत रवाना होवुन पाटील ईस्टेट ब्रिजखाली, हॉटेल कुरेश हॉटेलजवळ, गल्ली नं. ८ शिवाजीनगर, पुणे येथे मिळाले बातमी प्रमाणे दोन महिला व दोन पुरुष हातामध्ये पांढरे व निळे रंगाचे पिशव्या घेवुन उभ्या असल्याचे दिसल्या. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने म.स.पो.नि. बेल्हेकर यांनी सदर दोन महिलांना हटकवुन जागीच अटकाव केला. पोलिस स्टाफची चाहुल लागताच त्यांचेसोबत असणारे दोन पुरुष तेथुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. सदर महिलांना त्याचे नाव व पत्ता विचारता त्यांचे नाव अनुक्रमे, १) झेनब कंबर इराणी (वय ४० वर्षे, रा. महात्मा गांधी वसाहत, खडकी, पुणे), २) मोसीना नादर इराणी (वय ३२ वर्षे, रा. गल्ली नं.८, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) असे असल्याचे सांगितले.

सदर महिलांची झडती घेतला त्यांचेकडुन अनुक्रमे, १) ९२,००० / – एक पांढरे रंगाची पिशवी त्यामध्ये गांजा हा अमली पदार्थ, त्याचे वजन २ किलो ३०० ग्रॅम किं. अं. व रोख रक्कम व इतर साहीत्य व २) ९६,०००/- एक निळे रंगाची पिशवी त्यामध्ये सर्व गांजा हा अमली पदार्थ, त्याचे वजन २ किलो, ६०० ग्रॅम किं. अं. व इतर साहीत्य असे एकुण २,२१,१३०/- येणे प्रमाणे वरील वजनाचा व किंमतीचा गांजा तसेच चिलीम, रोख रक्कम, मोबाईल फोन, असे मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेली आहे. सदरबाबत आरोपी १) झेनब कंबर इराणी, २) मोसीना नादर इराणी, ३) जमिर कंबर इराणी (पुर्ण पत्ता माहित नाही) ४) जावेद इराणी यांचेविरुध्द खडकी पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं. ६६ / २०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब), II (ब) अन्वये गुन्हा नोंद असुन सदर गुन्ह्याचा तपास म सहा पोलिस निरीक्षक कल्याणी पाडोळे, खडकी पोलिस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, विजयकुमार मगर, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०४, पुणे शहर, आरती बनसोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर गिरीशकुमार दिघावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरीक्षक श्वेता बेल्हेकर, सहा पोलिस निरीक्षक कल्याणी पाडोळे, पोलिस उप निरीक्षक, आण्णा गुंजाळ, पो.ना. निकाळजे, पो.ना. कलंदर, पो. शि. अतुल इंगळे, पो. शि. अनिकेत भोसले, म.पो.शि.७९७८ शिंदे, म.पो.शि.९७२६ म्हस्के यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास म. सहा पोलिस निरीक्षक कल्याणी पाडोळे, खडकी पोलिस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी खून; आईच्या हत्येनंतर मुलगा…

शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित आरोपी ससून रुग्णालयातून पळाला…

पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना मोठा दणका…

पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल…

पोलिस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर; गुन्हेगारांमध्ये धडकी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!