पोलिसकाकावर हात उचलणं भाजप आमदार सुनील कांबळे यांना भोवलं…

पुणे : भाजप आमदार सुनील कांबळे यांना पोलिस कर्मचाऱ्यावर हात उचलणे भोवले असून, त्यांच्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयातील कार्यक्रमात आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसाच्या कानशिलात लगावली होती. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उपमुख्यामंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. ५) ससून रुग्णालय बी जे मेडिकल कॉलेजमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता. कार्यक्रम संपल्यावर पोलिस कर्मचारी शिवाजी सरक हे त्यांचे कर्तव्य बजावत होते. आमदार सुनील कांबळे यांनी सरक यांच्या कानशिलात लगावली होती. संबंधित घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करताना तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. विरोधकांनी देखील भाजप आणि सरकार विरोधात टिप्पणी केली होती. अखेर. रात्री या मारहाण प्रकरणी सुनिल कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अजित पवार गटाचे वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र सातव यांना आमदार कांबळे यांनी कानशिलात लगावली. त्यानंतर कार्यक्रम संपल्यावर स्टेजवरून खाली उतरत असताना एका पोलिस कर्मचाऱ्याच्याही कानशिलात लगावली. जितेंद्र सातव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैदकीय पक्षाच्या केंद्राचे प्रमुख आहेत. त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्येच सुनील कांबळे यांनी जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावल्याचे समोर समोर आले आहे.

सुनील कांबळे बोलताना म्हणाले की, ‘मी कार्यक्रमातून बाहेर पडलो. सकाळी लवकर उठल्यामुळे नाश्ता झालेला नव्हता, गोळ्या घ्यायच्या होत्या त्यामुळे घाईगडबडीत बाहेर पडलो. कार्यालयात आल्यावर मला माहिती पडलं की, हे सगळं लाईव्ह सुरू झालेले आहे. काय झालंय हेच मला कळालं नाही, मी कोणालाच मारहाण करण्याचा संबंधच नाही. तो कोण व्यक्ती आहे, मी त्याला ओळखत नाही, मी का मारू त्याला?

पुणे शहरात भाजप आमदाराची अजित पवार यांच्यासमोरच पोलिसाला मारहाण…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!