
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीस २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा…
घाटंजी (यवतमाळ) / अयनुद्दीन सोलंकी : पुसद तालुक्यातील मोखड येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी मधुकर शामराव बोंबले (वय ६३ रा. मोखड ता. पुसद) यांस पुसद येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती निता हेमंत मुखरे यांनी २० वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. सदर प्रकरणात शासनाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ॲड. एस. बी. शर्मा हिने मांडली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस शिपाई दादाराव चिल्होरकर यांनी काम पाहिले.
पुसद पोलिस स्टेशन अंतर्गत मोखड येथे एका अल्पवयीन मुलीला आरोपी मधुकर शामराव बोंबले याने भावाच्या घरी नेऊन अत्याचार केला होता. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात अपराध क्रंमाक १३५/२०२२ अन्वये भादंवि कलम ३७६ (२) (१), ३२३, ५०६ पोक्सो कलम ८, १२ अंतर्गत दि. ३१ मार्च २०२२ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास पुसद ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) राजु खार्डे यांनी तपास करून पुसद येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
सदर प्रकरणात एकुण ११ साक्षीदार तपासण्यात आले. लैंगिक छळाचा गुन्हा सिद्ध झाल्याने पोक्सो ॲक्ट २०१२ चे कलम ४ (२) नुसार आरोपी मधुकर बोंबले यांस २० वर्षाची शिक्षा व १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. कलम ८ अ नुसार ५ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व १० हजार रुपये दंड, भादंवि कलम ३२३ अंतर्गत ६ महिण्याची शिक्षा व १ हजार रुपये दंड, भादंवि कलम ५०६ अंतर्गत १ वर्षाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. आरोपीला सर्व शिक्षा एकत्र भोगावयाचे आहे.
प्रियकराला विष घालून ठार मारणाऱ्या प्रेयसीला फाशीची शिक्षा…
पोलिसकाकाचा खून केल्या प्रकरणी हिवरी येथील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा…
विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला 30 वर्षांची शिक्षा…
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी 3 वर्षाची शिक्षा अन्…
Video: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तालिबानी शिक्षा अन् मृत्यू…

