मुख्याध्यापक रजिस्टर पाहण्यासाठी बोलवायचा अन् शाळेतच अश्लील चाळे करायचा…

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कुक्कामेटा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने चक्क तिसरी आणि पाचवीत शिकणाऱ्या मुलींसोबत लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलींच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून लाहेरी पोलिसांनी मुख्याध्यापकास अटक केली आहे.

रविंद्र गव्हारे असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. मुख्याध्यापक गव्हारे हा एका-एका मुलींना रजिस्टर पाहण्याच्या बहाण्याने आपल्या कक्षात बोलवायचा आणि मुलींशी अश्लील चाळे करायचा. याबाबत कोणाला काही सांगितल्यास शाळेतून काढून टाकण्याची आणि मारण्याची धमकी द्यायचा, असे पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. मुख्याध्यापकांच्या धमकीने घाबरलेल्या मुलींनी प्रथम पालकांना देखील याबाबत सांगितले नाही. पण, काही मुलींनी शाळेत जाण्यास नकार दिल्यानंतर पालकांनी त्यांना विश्वासात घेऊन विचारले असता, हा प्रकार समोर आला आहे.

दरम्यान, या घटनेने जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, मुख्याध्यापक रविंद्र गव्हारे याच्याविरूद्ध बाल लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटी कलमांखाली गुन्हा दाखल करुन त्यास भामरागड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…

धक्कादायक! पुणे शहरात शिक्षिकेने शाळेतच ठेवले विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध…

धक्कादायक! विद्यार्थिनीने शाळेतच दिला बाळाला जन्म अन् जाळले…

पुणे जिल्ह्यात शिक्षकाने शाळेत केला अल्वपयीन मुलीचा विनयभंग; पाहा कारनामे…

Video: प्राचार्य आणि शिक्षिकेचा शाळेतच रोमान्स; व्हिडिओ व्हायरल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!