
कंडोम आणि मृत झुरळांचा वापर करून तब्बल 63 हॉटेल्सना फसवले…
बीजिंग (चीन): चीनमध्ये एका युवकाने कंडोम आणि मृत झुरळांचा वापर करून अनेक हॉटेल धारकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. वापरलेल्या कंडोमचा वापर करून जवळपास 63 हॉटेल्सना फसवले आहे. हा व्यक्ती त्या हॉटेल्समध्ये राहायचा, सगळ्या सुविधाही घ्यायचा आणि वरती त्यांनाच ब्लॅकमेल करून पैसे उकळात असायचा.
चीनमधील हा युवक (वय २१) कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून, काही कारणास्तव त्याला शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या या युवकासमोर रोजचा दिवस कसा काढायचा? असा प्रश्न होता. त्यावर त्याने एक शक्कल लढवली आणि त्या माध्यमातून त्याने अनेक हॉटेल्सची फसवणूक करण्यास सुरवात केली.
सार्नेस जिआंग (वय २१) असे फसवणूक करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. एखाद्या हॉटेलमध्ये चेक इन करायचा. त्यानंतर सोबत आणलेले मृत झुरळ, वापरलेले कंडोम्स, केस आणि इतर कचरा असलेल्या गोष्टी त्या हॉटेलमध्ये इतरत्र टाकायचा. चेक इन केल्यानतंर आपल्याला या गोष्टी दिसल्या, तुमच्या हॉटेल्सची सुविधा चांगली नाही असे सांगत तो त्याची तक्रार करण्याची धमकी द्यायचा. शिवाय, मोठा आरडा-ओरडा करायचा आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करायचा. शेवटी हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांच्याकडूनच पैसे वसूल करायचा. गेल्या वर्षभरापासून तो 300 हून अधिक हॉटेलमध्ये थांबल्याचे तपासात समोर आले आहे. त्यापैकी 63 हॉटेल्समध्ये त्याने हा प्रकार केला आणि त्यांच्याकडून पैसे वसूल केले आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जियांग अनेक वेळा एकाच दिवसात तीन-चार हॉटेलमध्ये चेक इन करत असे. हॉटेलमधील छोट्या-छोट्या चुका तो निदर्शनास आणून देत असे. त्या ठिकाणी कचरा आहे, साफसफाई नाही, डास आणि किडे आहेत अशी तक्रार करायचा. ही गोष्ट माध्यमांच्या निदर्शनास आणून देईन असे सांगत धमकी द्यायचा. त्या बदल्यात तो हॉटेलमध्ये मोफत राहायचा आणि त्यांच्याकडूनच पैसे वसूल करायचा. हॉटेल्सच्या कर्मचाऱ्यांनीही भीतीपोटी त्याची तक्रार केली नाही. पण या तरुणाचे हे फसवणुकीचे प्रकार उघडकीस आल्यानंतर मात्र त्याची चर्चा सुरू झाली. या प्रकरणी काही हॉटेल्सनी तक्रार केली. त्यानंतर अनेक हॉटेल्समध्ये हाच प्रकार झाला आणि त्याच तरुणाने हा प्रकार केल्याचे समोर आले आणि पकडला गेला.’
विकृती! मेट्रोत महिलांसमोरच केले हस्तमैथून; Video Viral…
Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…
Video: चिनी-पाकिस्तानी युवतीची भररस्त्यात हाणामारी…
भारतातील युवतीचे पाकिस्तानी युवकासोबत ऑनलाइन लग्न; पुन्हा भारतात परतली अन्…
पाकिस्तानमध्ये मुख्याध्यापकाचा तब्बल 45 महिलांवर बलात्कार…

