
पुणे! सराईत गुन्हेगार व तडीपार आरोपीकडून चार पिस्टल व आठ जिवंत काडतुसे जप्त…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस दलाच्या खंडणी विरोधी पथक ०२ पथकाने सराईत गुन्हेगार व तडीपार आरोपी यांच्याकडून चार पिस्टल व आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
खंडणी विरोधी पथकास नेमणुकीस असलेले पोलिस उप-निरीक्षक गौरव देव व पोलिस हवालदार १०१५ अनिल कुसाळकर यांना मिळालेल्या गोपनिय बातमीचे आधारे व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे राजेश्वरी नगरी, आलोवेरी सोसायटी, बी विंग, फलॅट नं. ४०२, वाघोली पुणे, येथे एकाच घरात तडीपार आरोपी
१) अमन दस्तगीर पटेल, रा. बाकोरी फाटा, वाघोली पुणे,
२) इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी, रा. गोकुळ पार्क, बकोरी फाटा, वाघोली, पुणे
३) गोपाळ संजय यादव, राहात असून ते दखलपात्र गुन्हा करण्याचे उददेशाने त्याचेकडे पिस्टल जवळ बाळगुन आहेत.
सदर बातमीची खात्री करुन सापळा रचून राहात असलेल्या फ्लॅट मध्ये छापा टाकुन चौकशी करुन घराची झडती घेवून आरोपींकडून ४ पिस्टल व ८ काडतुसे असा एकुण १,६४,००० / – माल खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा यांनी जप्त केला आहे. यातील आरोपी
१) गोपाळ संजय यादव याचेवर दरोडा, खुनाचा प्रयत्न राईट असे एकुण २ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
२) अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल यांचेवर अहमदनगर येथे दरोडा, तसेच लोणीकंद पोलिस स्टेशन येथे आर्म अॅक्ट व तडीपार याप्रमाणे ३ गुन्हे दाखल आहेत.
३) इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी, यांचेवर मोक्का, दरोडा, आर्म अॅक्ट, तडीपार, असे एकुण गंभीर स्वरुपाचे ५ गुन्हे दाखल आहेत
४) देवानंद शिवाजी चव्हाण (रा मारुती आळी शिरुर पुणे)
सदरची उल्लेखनिय कामगीरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पुणे शहर शैलेश बलकवडे (गुन्हे), पोलिस उप आयुक्त निखील पिंगळे (गुन्हे), सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक ( गुन्हे -२), व खंडणी विरोधी पथक – २ पोलिस निरीक्षक छगन कापसे (अति. कार्यभार – गुन्हे) पोलिस उप-निरीक्षक गौरव देव, सपोफौ सुनिल पवार, व पोलिस अंमलदार अनिल कुसाळकर, चेतन आपटे, अजिनाथ येडे, अमोल घावटे, अमोल राउत, सैदोबा भोजराव, सुरेंद्र जगदाळे, चेतन चव्हाण, दिलीप गोरे, पवन भोसले, प्रशांत शिंदे, आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांनी मा. वरिष्ठांचे मार्गदर्शना खाली केली आहे.
पुणे जिल्ह्यातील पोलिसाचा धक्कादायक Video Viral…
पुणे! IT इंजिनियरचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् चिमुकल्याचा चिरला गळा…
पुणे! हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणात नवा ट्वीस्ट…
पुणे शहरातून गुन्हेगार तडीपार; आढळल्यास संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन…
पुणे! भारती विद्यापीठ पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांनी केले कौतुक!

