
जळगावमध्ये कुंटणखान्यावर छापा, 10 ‘डर्टी आंटी’सह 60 युवती ताब्यात…
जळगाव : चोपडा येथे नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला असून, तब्बल ६० महिलांना ताब्यात घेतले आहे. शिवाय, कुंटणखाना चालवणाऱ्या ११ महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
चोपडा शहरातील नगर पालिकेच्या पाठीमागील परिसरातच अवैधरित्या कुंटणखाना सुरू होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्यातील निरीक्षक मधुकर सावळे व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमालकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथकाने बुधवारी सायंकाळी ६ वाजता ही कारवाई केली.
पोलिसांच्या कारवाईदरम्यान जिल्ह्यासह परराज्यातील ६० युवती आढळून आल्या आहेत. तर कुंटणखाना चालवणाऱ्या 10 महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 5 दलाल, 10 मालकीण महिलांसह 60 महिलांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पाचगणीमध्ये रिसॉर्टवर पोलिसांचा छापा; बारबालांसह 48 जण ताब्यात…
हॉटेलवर रात्रीच्या सुमारास छापा अन् बारबालांसह एकच पळापळ…
संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…
पुणे शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह दोन मॉडेल…
प्राध्यापकाच्या बंगल्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; परदेशी युवतीसह…

