येरवडा कारागृहातील कैद्यांकडे आढळले मोबाईल; गुन्हा दाखल…

पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडे दोन मोबाइल, दोन बॅटऱ्या आणि एक सिमकार्ड सापडले आहे. याबाबत तुरुंगाधिकारी रेवनाथ कडू कानडे (वय 54) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी न्यायबंदी तालीम मोहम्मद खान, राजु तुकाराम अस्वले, सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप व आकाश उत्तम रणदिवे यांच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात कारागृह कायदा 1894 नियम 42, 45 (12) आयपीसी 188, 120(ब), 34 नुसार मंगळवारी (ता. 8) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी तालीम खान हा मोबाईल वापरत असल्याची माहिती मिळाली. आरोपीला बोलावून घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात मोबाईल फोन बॅटरीसह लपवून ठेवल्याचे आढळून आले. 6 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या दरम्यान टिळक सेप्रेट खोली क्रमांक 30 मध्ये झडती घेण्यात आली. त्यावेळी न्यायबंदी राजू अस्वले याच्या अंगझडती मध्ये मोबाईल फोन बॅटरीसह व सिमकार्ड लपवून ठेवल्याचे आढळून आले.

आरोपी राजु अस्वले, सचिन उर्फ पप्पू घोलप व आकाश रणदिवे यांनी संगनमत करुन येरवडा मध्यवर्ती कारागृहात बाहेरुन आतमध्ये मोबाईल फोन घेऊन येऊन त्याचा वापर केला. आरोपींनी कारागृह नियमांचा भंग केला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलिस निरीक्षक कांचन जाधव, पोलिस उपनिरीक्षक सुरेखा गाताडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सुरेखा गाताडे करीत आहेत.

येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…

येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…

अमिताभ गुप्ता यांची संकल्पना! येरवड्यातील कैदी उपहागृहात बनवणार विविध पदार्थ…

येरवडा हद्दीत गुन्हे करणाऱया टोळीवार मोक्का अंतर्गत कारवाई; पाहा नावे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!