ट्रकला लागेलल्या आगीत 30 शेळ्यांचा होरपळून मृत्यू; पोलिसकाका जखमी…

बीड : बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाडळसिंगी परिसरात दोनशे शेळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक लागलेल्या आगीत 30 शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने या ट्रकमधील 170 शेळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलिस व स्थानिकांना यश आले. मात्र, या शेळ्यांना सुखरुप बाहेर काढताना महामार्गावरील पोलिस कर्मचारी, हवालदार अन्सार मोमीन हे किरकोळ जखमी झाले आहेत.

राजस्थानकडून 200 शेळ्या घेऊन ट्रक हैदराबादकडे निघाला होता. प्रवासादरम्यान ट्रकच्या डिझेल टाकीजवळ अचानक आग लागली. ट्रकचालकास याबाबत समजताच त्याने तात्काळ ट्रक थांबवून ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण ट्रकला भीषण आग लागली. ट्रक आग लागल्यानंतर शेळ्यांनी ओरडणे सुरू केले. यामुळे हाहाकार उडाला होता.

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच महामार्ग पोलिस व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, या ट्रकमध्ये असलेल्या शेळ्या बाहेर काढण्यासाठी सर्वांची जीवाची बाजी लावली. आग लागलेल्या ट्रकमधून शेळ्यांना सुखरुपणे बाहेर काढताना या सर्वांची दमछाक झाली. मात्र, तब्बल 170 शेळ्यांना घेऊन सुखरुप बाहेर काढण्यात आले. दुर्देवाने 30 शेळ्यांचा भीषण आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.

दरम्यान, ट्रकला आग लागल्यानंतर शेळ्यांचा जीव वाचवताना या बचाव कार्यामध्ये पोलिस हवालदार अन्सार मोमीन किरकोळ जखमी झाले आहेत.

हृदयद्रावक! बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू…

प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेलेला प्रियकराचा होरपळून मृत्यू…

गुजरातमध्ये गेम झोनमध्ये भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू…

भाविकांच्या बसला लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू…

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील चिमुकल्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू; अश्रू अनावर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!