
नवा ट्विस्ट! सोनमने नवऱ्यासमोर शरीरसंबंधासाठी ठेवली होती एक अट…
भोपाळ (मध्य प्रदेश): इंदूर येथील रहिवासी असणाऱ्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना बुधवारी शिलाँग न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर सोनम रघुवंशी आणि इतर चार आरोपींना शिलाँग सदर पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले. पाचही जणांच्या केलेल्या चौकशीतून आता राजा रघुवंशी हत्या प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. सोनम हिने लग्नानंतर शरीरसंबंध ठेवण्यासाठी पती राजा रघुवंशी याच्यासमोर एक अट ठेवली होती. ज्यामुळे राजा सोनमच्या जाळ्यात अडकला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपी सोनमने लग्नानंतर शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी पती राजा रघुवंशी याच्यासमोर एक अट ठेवली होती. शरीरसंबंध ठेवायचे असतील तर त्याआधी आसाममधील गुवाहाटीला जावे लागेल. तेथील कामाख्या देवीला नैवेद्य अर्पण करावा लागेल. हा विधी पार पाडल्यानंतरच शरीरसंबंध ठेवता येतील, अशी अट सोनम हिने पती राजाला घातली होती. यामुळेच राजा गुवाहाटीला जाण्यास तयार झाला आणि तो सोनमच्या जाळ्यात अडकला अशी धक्कादायक माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राजाच्या हत्येचा कट रचला होता. त्यावेळी सोनम हिचा प्रियकर राज कुशवाह याने तिन्ही मारेकऱ्यांना सर्वप्रथम रेल्वेने गुवाहाटीला पाठवले होते. त्यानंतर आरोपींनी शिलाँगमध्ये राजा रघुवंशीची हत्या केली. सोनमचे कथित प्रेमी राज कुशवाह आणि आकाश राजपूत यांना सदर पोलीस ठाण्याच्या एका कोठडीत ठेवण्यात आले आहे. तर विशाल सिंग चौहान आणि आनंद सिंग कुर्मी यांना दुसऱ्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. आरोपींच्या वर्तनावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी सदर पोलीस ठाण्यात आणि सर्व कोठडीत अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
आरोपींचे ठिकाण आणि हालचालींचाही पोलीस तपास करत आहेत. हत्येचा तपास जसजसा पुढे जाईल तसतशी अधिक माहिती मिळत आहे. ही हालचाल नियोजित होती की फक्त पळून जाण्याचा प्रयत्न होता, हेही समजू शकेल, असेही पोलिसांनी सांगितले.
धक्कादायक! पतीच्या हत्येनंतर सोनमने घालवली प्रियकरासोबत रात्र…
सोनमचे होते नोकरावर प्रेम अन् हनिमूनवेळी केला नवऱ्याचा गेम; पाहा टाईमलाईन…
राजा आणि सोनम रघुवंशी हनिमून प्रकरणी धक्कादायक खुलासा; सोनमला अटक…
नेत्याला रंगेहाथ पकडलं; माझ्याशी लग्न करून दुसऱ्याबरोबर मजा करतोस…
नवरदेवासमोरच नवरीने तीन मुलांच्या बापासोबत काढला पळ…
रांजणगाव तिहेरी हत्याकांडाचं गूढ उलगडलं! दाजीच्या भावासोबत प्रेमसंबंध जुळलं अन्…
हनिमूनच्या रात्री नवरी म्हणाली मला बॉयफ्रेंड आहे, हात लावायचा नाही…
हनिमूनच्या रात्रीच पत्नीने काढली नवऱ्याची खोड अन् ठोकली दिरासोबत धूम…

