पुणे शहरात मराठी व्यावसायिक समूहाची एक कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक…

पुणे : ज्येष्ठ नागरिकांसाठी निवास आणि उपचार व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या मराठी व्यावसायिकांच्या समूहाला एका पंजाबी कुटुंबाने खोटी माहिती देऊन बेकायदेशीर बांधलेली इमारत नोंदणीकृत करार करून भाड्याने दिली. व्यावसायिकांनी व्यवसायासाठी इमारतीमध्ये फर्निचर, अंतर्गत व्यवस्थेकरिता तब्बल एक कोटी ७५ लाख रुपये गुंतवले. त्यानंतर विविध प्रकारच्या व्यावसायिक परवान्यासाठी इमारतीची आवश्यक कागदपत्रे मागितल्यानंतर गुंडांना आणून जागेचा ताबा घेतला. दरम्यान आता मराठी व्यावसायिकांनी गुंतवलेली रक्कम नुकसानभरपाई म्हणून परत करावी किंवा आवश्यक ती कागदपत्रे द्यावीत अशी मागणी केली आहे. वाघोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत महामार्गालगतच पंजाबी कुटुंबाची तीन मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये यापूर्वी लॉजिंग आणि बारचा व्यवसाय सुरू होता. ही इमारत पुणे येथील बांधकाम व्यावसायिक डॉ. सुनील कुलकर्णी यांच्यासह चार भागीदारांनी भाड्याने घेतली. भाडेकरार करताना आवश्यक त्या परवानग्या दिल्या जातील, असे आश्वासन इमारत मालकांनी दिले. मात्र, प्रत्यक्ष जागेचा ताबा घेऊन लिफ्ट, अग्नीशमन व्यवस्था इत्यादी व्यवस्थांसाठी महानगरपालिकेकडे परवानग्याकरिता जागेची कागदपत्रे मागितली असता मालकांनी टाळाटाळ केली. तपास केला असता, ती इमारतच बेकायदा उभी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याविरूद्ध डॉ. कुलकर्णी, दुसरे भागीदार किरण इनामदार आणि महेश भालेराव यांनी मिळून वाघोली पोलिस चौकीत तक्रार दिली आहे. पोलिसांनी एफआयआर नोंद करून घेतली. त्यानंतर पंजाबी कुटुंबाने पोलिसांवर दबाव आणून अधिकृत करार झालेला असताना आणि सर्व रक्कम जमा केलेली असतानाही गुंडांना आणून बळाचा वापर करून इमारतीमध्ये असलेले ज्येष्ठ नागरिक, परिचारिका, डॉक्टर्स यांना बाहेर काढले आणि अनधिकृतपणे ताबा घेतला. वाघोली पोलिसांनी पीडीतांची नोंदवलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

मराठी व्यावसायिकांची मागणी…
मराठी व्यावसायिकांनी एकत्र येऊन व्यवसायामध्ये कर्ज काढून एक कोटी ७५ लाख रुपये गुंतवले. शिवाय, मालकांसोबत केलेल्या कराराप्रमाणे तीन महिन्यांच्या भाड्याच्या रकमेइतक्या डिपॉझीटसह दरदहा १० लाखाहून अधिक भाडे जमा केले आहेत. मात्र, तिसऱ्याच महिन्यात इमारत बेकायदा असल्याचे निदर्शनास आल्याने मराठी व्यावसायिक अडचणीत आले आहेत. गुंतवणूक केलेली रक्कम परत करावी अथवा आवश्यक ती कागदपत्रे देऊन भाडेकरार सुरू ठेवावा, अशी मागणी मराठी व्यावसायिकांनी केली आहे.

पुणे विमानतळावर खळबळ! ‘चायनीज फूड’चा डबा उघडताच अधिकारीही थक्क…

पुणे शहरातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल; नोकरी गेली म्हणून…

पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत होणार पाच नवीन पोलिस ठाणी…

पुणे पोलिसाच्या मोबाईलवर आली जाहिरात अन् बँकेतून पैसे गायब…

पुणे! नामांकित डॉक्टरने घेतला गळफास; सुसाईड नोटमध्ये लिहिलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!