
नाशिक शहर पोलिसांनी काढली गावगुडांची धिंड…
नाशिकः घरांवर दगडफेक करत दहशत माजविणार्या गावगुडांची नाशिक शहर पोलिसांनी रविवारी (ता. २२) सदगुरुनगरमध्ये धिंड काढली. गावगुंडांनी जिथे दहशत माजवली तिथेच गुंडांचा पोलिसांनी माज उतरवल्याने नागरिकांना आनंद झाला. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
अरुण बंडी (वय २७) व महेश सोनवणे (२१) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहेत. सातपूरमधील सदगुरूनगर परिसरात शनिवारी (ता. २१) रात्री १०.१५ च्या सुमारास सुमारे १२ गुंडांनी हातात कोयता नाचवत दहशत माजवली होती. या भागातील काठे अपार्टमेंट या इमारतीवर व एका दुकानावर गुंडांनी दगडफेक केली. यावेळी इमारतीतील १० फ्लॅटच्या काचा फुटल्या. जुन्या वादातून गुंड समीर सय्यद नावाच्या युवकाला मारहाण करण्यासाठी गुंड आले होते. मात्र, युवक व त्याचा मित्र आव्हाड मिळून न आल्याने गुंडांनी परिसरात हातातील कोयते नाचवले व दहशत निर्माण करण्यासाठी दगडफेक केली. दुचाकीवरून जाताना रात्री शतपावली करणार्या येथील रहिवाशांनाही कोयता दाखवत शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवत तपास सुरू केला.
दहशतीमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. कोयता हातात घेऊन दहशत पसरवणार्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी परिसरातील नागरिकांनी केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी तातडीने कारवाई करत नागरिकांना दिलासा दिला आहे.
नाशिकमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने घेतला गळफास…
नाशिक हादरलं! चिमुकलीला विष पाजून पती-पत्नीची आत्महत्या; घरात…
नाशिक शहर आयुक्तालयातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…
Video: नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्यांना महिलेने शिकवला चांगलाच धडा…
नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी…

