
भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी…
पुणे (सुनिल सांबारे): भोसरी, चिंचवड परिसरात मोटार सायकली चोरणाऱ्या व दुकान फोडणाऱ्या सराईत चोरटयास अटक करून चोरीच्या तब्बल ०५ मोटारसायकलसह एकूण ३,१८,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाने हस्तगत केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पिपंरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत भोसरी पोलिस स्टेशन हददीत मोठया प्रमाणात रहिवासी व रहदारी असणारे क्षेत्र असल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १, विवेक पाटील, सहायक पोलिस आयुक्त पिंपरी विभाग विठ्ठल कुबडे यांनी वारंवार होणा-या मोटारसायकल चोरीच्या घटनांना पायबंद घालून मोटारसायकल चोरीबाबतचे गुन्हे उघड करण्याबाबत शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस ठाणे यांना सुचना दिल्या होत्या.
भोसरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी भोसरी पोलिस ठाणे हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथकातील सपोनि कल्याण घाडगे, पोलिस उपनिरीक्षक मुकेश मोहारे व अमंलदारांना मार्गदर्शन करून वाहनचोरीचे विशेष पथक तयार केले व त्यांना सुचना दिल्या. तपास पथक अधिकारी, अंमलदार यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणांना भेटी देउन परिसरातील सीसीटिव्ही द्वारे बारकाईने तपास केला. सातत्याने विविध ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासत तसेच सदर ठिकाणी मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण केले व मोटारसायकल चोरी करणा-या चोरटयाबाबत माहिती प्राप्त केली. २६/१२/२०२३ रोजी शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस ठाणे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सपोनि कल्याण घाडगे, पोलिस उप निरीक्षक मुकेश मोहारे, पोलिस अंमलदार सचिन सातपुते, तुषार वराडे, सागर जाधव यांनी मोटारसायकल चोरटयांचे सीसीटिव्ही फुटेज तसेच मोबाईल फोनच्या तांत्रिक विश्लेषणादवारे आरोपी विरेंद्र कुमार मिस्त्रीलाल (वय २३, रा. सध्या फिरस्ता, मुळ पत्ता- चमंधा, कसिया कौशाम्बी, भरवारी, उत्तरप्रदेश) यास धावडेवस्ती भोसरी येथून सापळा लावुन ताब्यात घेतले.
सदर आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने भोसरी व चिंचवड येथून चोरी केलेल्या ०५ मोटारसायकल काढून दिलेल्या असून त्या गुन्हयाच्या तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच त्याने पूर्वी तो काम करीत असलेल्या भोसरी येथील एका वाईनशॉपमध्ये दोन वेळा चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबाबत तपास चालू आहे.
भोसरी पोलिस ठाणेकडील तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय शिताफीने व कौशल्यपूर्ण तपास करून अटक आरोपी विरेंद्र कुमार मिस्त्रीलाल याच्याकडून एकूण ०५ चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करून मोटारसायकल चोरीचे एकूण ०५ गुन्हे तसेच त्याने पुर्वी काम करीत असलेल्या उमेश वाईन्स, भोसरी या दुकानात चोरी केलेले ०२ घरफोडीचे गुन्हे असे एकूण ०७ गुन्हे उघडकीस आणून रूपये ३,१८,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, विनयकुमार चौबे, सह. पोलिस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त परि. १, विवेक पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त, पिंपरी विभाग, विठठल कुबडे यांच्या सुचना व प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, सपोनि कल्याण घाडगे, पोउपनि मुकेश मोहारे, डी बी केंद्रे, मपोहवा मुळे, पोना नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, पोलिस अंमलदार सचिन सातपुते, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सागर जाधव, प्रभाकर खाडे, महादेव गारोळे, मपोहवा भाग्यश्री जमदाडे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

भोसरी पोलिसांकडून सराईत गुन्हेगार ४८ तासात जेरबंद…
वाकड पोलिसांनी चोरी करणाऱ्या तमिळनाडूच्या गॅंगला केले जेरबंद अन्…
चिखली पोलिसांनी चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला केले जेरबंद…
पिंपरी-चिंचवडमध्ये युनिट-४ कडून १४ गुन्हे उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
दिघी पोलिसांनी सराईताकडून दुचाकी केल्या जप्त; पाहा दुचाकींचे क्रमांक…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

