
सोलापूरमध्ये दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या मित्रांचा अपघाती मृत्यू…
सोलापूर : सोलापूरमध्ये दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या तिन मित्रांचा महावीर चौक रस्त्यावर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला आहे. इरण्णा मठपती, निखिल कोळी, दिग्विजय सोमवंशी अशी मृत युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
सोलापूर शहरातील महावीर चौक येथे रविवारी (ता. २८) मध्यरात्री दुचाकी झाडाला धडकली. यामध्ये इरण्णा मठपती (वय 24), निखिल कोळी (वय 24), दिग्विजय (आतिश) सोमवंशी (वय 21) यात तिघेही गंभीर जखमी झाले होते. बेशुद्ध अवस्थेतील या तिघांना पोलिसांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी या तिघांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच शासकीय रुग्णालयात मित्र आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही तरुणांना तात्काळ रुग्णालयात हलवले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. एकाच गावातील तीन युवकांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चालकाला डुलकी लागली अन्…
अहमदनगर-कल्याण भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू…
नवस फेडायला जाताना भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे…
पोलिसकाकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…
बीडमध्ये भीषण अपघातात पाच जागीच ठार; गावावर शोककळा…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

