
अहमदनगर-कल्याण भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू…
अहमदनगर : अहमदनगर-कल्याण महामार्गावर एसटी बस आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ढवळापूर फाट्याजवळ असलेल्या एसटी बस, इको गाडी आणि उसाच्या ट्रॅक्टरमध्ये मंगळवारी (ता. २३) मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको मोटारीमध्ये अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी ५ जणांचा मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात तर एकाचा अहमदनगर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. अपघातग्रस्तांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नवस फेडायला जाताना भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे…
पोलिसकाकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…
बीडमध्ये भीषण अपघातात पाच जागीच ठार; गावावर शोककळा…
कुटुंबच संपलं! दुचाकी अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू…
दुचाकी अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू; दुचाकीचे दोन तुकडे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

