Video: पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थाची तस्करी करणारे गुन्हेगार यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी कठोर पाऊल उचलणेबाबत दिलेल्या सुचनांप्रमाणे अपर पोलिस आयुक्त गुन्हे पुणे व पोलिस उप आयुक्त गुन्हे पुणे शहर यांनी मार्गदर्शन करुन त्याप्रमाणे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आज (सोमवार) गुन्हे शाखा युनिट- १ कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद व त्यांचेकडील अधिकारी व अंमलदार असे रात्रीचे वेळी हद्दीत गस्त घालीत असताना पोलिस अंमलदार विठ्ठल सांळुखे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, २७६, सोमवार पेठ, पुणे चे समोर एक पांढरे रंगाची इर्टीगा कार नं. एम एच. १२ यु.जे. ४०८१ यामध्ये ड्रायव्हींग सिटवर एक व्यक्ती बसलेला दिसला व त्याचे शेजारच्या सिटवर पोलिस अभिलेखावरील आरोपी वैभव उर्फ पिंटया भारत माने (रा. पुणे) हा बसलेला दिसला. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील असल्याने व त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे बातमी प्राप्त झाली.

युनिट-१ कडील अधिकारी व स्टाफने सदर ठिकाणी जावुन सदरची कार थांबवून अधिक चौकशी केली असता त्यांचे बोलणे अधिक संशयास्पद वाटल्याने त्यांची पंचा समक्ष झडती घेतली असता त्यांचे कब्जात रेकॉर्डवरील आरोपी वैभव उर्फ पिंटया भारत माने याचे कब्जात १,००,००,०००/- चा ५०० ग्रॅम इतके वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ मिळून आल्याने रेकॉर्ड वरील आरोपी वैभव उर्फ पिंटया भारत माने व कार चालक अजय आमरनाथ करोसिया (वय ३५ वर्ष रा. पुणे) यांना जागीच ताब्यात घेण्यात आले आहे. सदर दोन्ही आरोपींकडे कसुन चौकशी केली असता वैभव उर्फ पिंटया भारत माने यास सदरची एम डी देणारा व्यक्तीचे नाव हैदर शेख (रा.विश्रांतवाडी, पुणे) याने काही वेळा पुर्वी दिल्याचे सांगितले.

गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकारी व अंमलदार त्यांच्या एकुण ५ टिम्स विश्रांतवाडी भागात विविध ठिकाणी रवाना केल्या असता हैदर नुर शेख (वय-४० वर्षे रा. विश्रांतवाडी, पुणे) हा विश्रांतवाडी परिसरात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले त्याची झडती घेतली असता त्याचे कब्जात १,००,००,०००/- किं रूक्रिस्टल पावडर स्वरुपातील ५०० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ मिळुन आला. त्याच प्रमाणे त्याचे झडतीमध्ये एक चावी मिळून आली त्याबाबत त्याचेकडे अधिक तपास करता सदरची चावी ही त्याचे विश्रांतवाडी, परिसरात असलेल्या एक पत्र्याचे गोडाऊनची आहे असे सांगितल्याने सदर ठिकाणी गोडाऊनची पहाणी केली असता त्यामध्ये १,५०,००,०००/- रूकिं चे ७५० ग्रॅम वजनाचे एमडी गोडाऊनमध्ये मिळून आले त्याच प्रमाणे सदर ठिकाणी २०० ते ३०० संशयास्पद पोती मिळून आली असून त्यामध्ये मीठ असल्याचे आढळून आले आहे. परंतु सर्व पोत्यांमध्ये एम. डी. आहे किंवा नाही याबाबत गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तपासणी करीत आहेत.

हैदर नुर शेख यांचेकडे नमुद मेफेड्रॉन अंमली पदार्थ कोणाकडुन आणला? याबाबत विचारणा केली असता, त्याने सदरचा एमडी अंमली पदार्थ हा परदेशी नागरीक यांनी मला विक्रीसाठी दिला असल्याचे सांगितले. सदर आरोपी वैभव उर्फ पिंटया भारत माने (रा, पुणे) व अजय आमरनाथ करोसिया रा. पुणे यांचे ताब्यात किं.रु.१,००,००,०००/- चे ५०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन अंमली पदार्थ, किं.रु.२,०००/- रोख रक्कम, किं. रु.००/- ची एक प्लॅस्टिकचे मोकळे बॉबीचे पॅकेट, कि.रु.२००/- ची स्पोर्टस् बॅग, किं.रु.१५०००/- चे दोन मोबाईल हॅण्डसेट, एक आधार कार्ड व किं. रु.८,००,०००/- ची एक इर्टीका कार असा एकुण किं. रु. १,०८, १७,२००/- चा ऐवज मिळुन आलेला आहे.

सदरचा ऐवजामधील मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीकरिता हैदर नुर शेख (वय ४०, रा. पुणे) याचे ताब्यात किं.रु.१,००,००,०००/- चे ५०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन अंमली पदार्थ, कि.रु.२००/- ची सॅकबॅग, किं.रु.१०,०००/- चे दोन मोबाईल हॅण्डसेट, असा एकुण किं. रु.१,००,१०,२००/- चा असा ऐवज मिळुन आलेला आहे. तसेच हैदर नुर शेख याने दाखविलेल्या पुणे येथील पत्र्याचे गोडावुन मध्ये साठवणुक केलेला किं.रु.१,५०,००,०००/- चा ७५० ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ, प्लॅस्टिकचे मोकळे पॅकेट, किं. रु.१०००/- चा एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा व एक चावी असा उपरोक्त सर्व मिळुन एकुण कि.रु. ३,५८,२८,४००/- चा अंमली पदार्थ व ऐवज मिळुन आलेला आहे. परदेशी नागरीक यांचा शोधा करीता गुन्हे शाखेकडील टिम रवाना केल्या आहेत. यातील ३ अटक आरोपीपैकी १. वैभग ऊर्फ पिटया माने २. हैदर शेख हे पुणे पोलिस अभिलेखावरील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, पुणे शैलेश बलकवडे पोलिस उप- आयुक्त, गुन्हे, पुणे अमोल झेंडे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे – १, पुणे सुनिल तांबे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे २, पुणे सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद युनिट ०१, अजय वाघमारे, राजेंद्र लांडगे, अनिता हिवरकर, विनायक गायकवाड, सपोनि बाबर, गायकवाड, पोलिस उप निरीक्षक रमेश तापकीर, शेळके, गोरे, कोळेकर, मगदुम, देव, नाईक, जाधव, शिंदे, मोकाशी, पोलिस अंमलदार विठ्ठल सांळुखे, अभिनव लडकत, दता सोनावणे, निलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशीकात दरेकर, शुभम देसाई, शंकर कुंभार, आय्याज दड्डीकर, सुजित वाडेकर, संतोष देशपांडे, निखिल जाधव यांनी केली आहे.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई; दोन पोलिस बडतर्फ…

पुणे शहरात परदेशी व्यक्तीकडून ३० लाखांचे कोकेन जप्त: अनिता हिवरकर

खडकी पोलिसांनी दोन महिलांना केली अटक; मुद्देमाल हस्तगत…

पोलिस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर; गुन्हेगारांमध्ये धडकी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!