पुणे शहरात कोयता गँगने धुमाकूळ घालत केली वाहनांची तोडफोड…

पुणे : पुणे शहरातील वडगाव शेरी परिसरातील गणेश नगरमध्ये कोयता गँगने 15 ते 20 वाहनांची तोडफोड केली. 6 कार, 4 रिक्षा, 3 दुचाकी आणि इतर वाहनांचे नुकसान झाले आहे. गुंडाने धुमाकूळ घालत कोयते आणि दगडांनी वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वडगावशेरीच्या गणेशनगर परिसरात शुक्रवारी (ता. २१) कोयता गँगने धुमाकूळ घालत हातामध्ये कोयते आणि दगड घेत वाहनांची तोडफोड केली. सिंहगड रस्त्यावरील क्रिकेट वाडी या ठिकाणी कोयता टोळीने धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर मध्यरात्री चंदननगर परिसरातील वडगावशेरीत वाहनांची कोयता टोळीने तोडफोड केली आहे.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

दरम्यान, पुण्यातील किरकटवाडी परिसरात काल संध्याकाळी 7.30 ते 9 च्या दरम्यान दहा ते पंधरा गुंडांनी हवेत कोयते फिरवून आणि दगडफेक करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. या टोळक्याने नागरिकांना जखमी करण्याचा प्रयत्न केला असून या घटनेत दगड डोक्याला लागल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. हवेली पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेतलं असून यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुख्य आरोपी आणि इतर सात आरोपींवर कलम 307, 354,323, 324, 143 आणि इतर कलमांतर्गत हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पुणे शहरातील अनेक भागात युवकांच्या टोळ्या हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. खंडणी वसूल करणे, धमकावणे, दहशत निर्माण करण्यासाठी शहरातील अनेक भागात हे तरुण हातात कोयते घेऊन फिरताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

पुणे शहरात पोलिसांसमोरच कोयता गँगने युवकांवर केला हल्ला…

पुणे शहरात कोयता गँगकडून व्यवसायिकाची हत्या; Video Viral…

Video: पुणे शहरातील कोयता गॅंगच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल…

Video: पुणे शहरात कोयता गॅंगने काढले पुन्हा डोके वर…

पुणे शहरात कोयता गँगने काढले पुन्हा डोके वर; पोलिसांनी काढली धिंड…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!