
पुणे पोलिस दलातील पोलिसाचा प्रताप; कोम्बिंग ऑपरेशन कारण अन् पत्नीने पकडले रंगेहाथ…
पुणे: पुणे शहर पोलिस दलातील एका पोलिस हवालदाराचे कारनामे त्याच्या पत्नीनेच उघडकीस आणले आहेत. ‘आज ड्युटीवर कोम्बिंग ऑपरेशन आहे,’ असे सांगून घराबाहेर पडलेल्या पोलिस पती पबमध्ये दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ सापडला. या प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा डागाळल्याचा ठपका ठेवत पोलिस उपायुक्त डॉ. सागर काकडे यांनी संबंधित हवालदाराला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
हवालदार हनुमंत गुलाब कांबळे (रा. वडकी) असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कांबळे हे काळेपडळ पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कांबळे यांनी आपल्या पत्नीला कामाचे कारण सांगून फसवले आणि ते एका महिलेसोबत पबमध्ये गेले होते. मात्र, संशय आल्याने त्यांच्या पत्नीने त्यांचा पाठलाग केला आणि पबमध्ये त्यांना दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडले.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
केवळ फसवणूकच नाही, तर कांबळे हे आपल्या पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळही करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने काळेपडळ पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, हनुमंत कांबळे यांनी आपले अनैतिक संबंध लपवून ठेवले होते. पत्नीने जाब विचारल्यास पोलिस असल्याचा धाक दाखवणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे आणि घटस्फोटाची धमकी देणे असा छळ ते सतत करत होते.
दरम्यान, या गंभीर प्रकाराची दखल घेत प्रशासनाने हनुमंत कांबळे आणि संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्तव्यावर असताना किंवा खाकी गणवेशाचा आदर न राखता अशा प्रकारचे कृत्य केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पुणे पोलिसाच्या मोबाईलवर आली जाहिरात अन् बँकेतून पैसे गायब…
पुणे पोलिस दलात एकच खळबळ! 32 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
पुणे पोलिस आयुक्तांचे PRO सहाय्यक पोलिस अधिकाऱ्याचं निलंबन…
पुणे! लाच प्रकरणातील API वैशाली तोटेवार निलंबित…
पुणे! आयटी क्षेत्रातील युवक-युवतीला पकडणारे तिघं पोलिस निलंबित…

