
पुणे शहरात पोलिसांसमोरच कोयता गँगने युवकांवर केला हल्ला…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील वडगाव शेरी परिसारत कोयता गँगचा पुन्हा धुडगूस घातला आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
वडगावशेरी परिसरात रविवारी (ता. २४) रात्री ११:४५ च्या सुमारास ही घटना घडली आहे. दोन गटात झालेल्या वादातून कोयत्याने हल्ला केला आहे. यामुळे स्थानिकांमध्ये दहशतीच वातावरण निर्माण झाले आहे. घटना घडली त्यावेळी महिला पोलिस अधिकारी तिथे उपस्थित होती. मात्र, पोलिसांना न जुमनता कोयता गँगने दुसऱ्या गटातील युवकावर कोयत्याने वार केले आहेत. जुन्या भांडणाचा राग मनात धरुन या युवकांनी कोयत्याने खुनी हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे. किरकोळ कारणातून बाचाबाची झाली होती. या भांडणाचा राग मनात धरत एका गटाने काल रात्री दुसऱ्या गटावर हल्ला केला. हल्ल्यात दोन ते तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
चंदननगर पोलिसांनी तीन सराइतांसह चौघांना अटक केली आहे. अनुज जितेंद्र यादव, हरिकेश टूणटूण चव्हाण (वय १८), आकाश भरत पवार (वय २३), अमोल वसंत चोरघडे (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अक्षत तापकीर, राहुल बारवसे यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनुज, हरिकेश आणि आकाश सराइत गुन्हेगार आहेत. सौरभ संतोष पाडळे (वय २२ रा. पाडळे निवास, सोमनाथनगर, वडगाव शेरी) याने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ पाडळेचा मित्र ऋषिकेश ढोरे याचे आकाशशी भांडण झाले होते. वाद मिटवण्यासाठी सौरभ मित्रांसह वडगाव शेरीतील दिगंबरनगर भागात आला होता. त्यावेळी आकाशने सौरभला मारहाण केली. अनुजने ऋषिकेशवर कोयत्याने वार केले. आरोपींनी शिवागाळ केली. यांना जिवंत सोडून नका, असे सांगून त्यांनी दगड फेकून मारले. सौरभचा मित्र अभी आगरकर आणि योगेश ऋषिकेशला वाचवण्यासाठी गेले. तेव्हा आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. आरोपींनी कोयते उगारून परिसरात दहशत माजविली. सहायक पोलिस निरीक्षक निलेश घोरपडे पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात कोयता गँगकडून व्यवसायिकाची हत्या; Video Viral…
Video: पुणे शहरातील कोयता गॅंगच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल…
Video: पुणे शहरात कोयता गॅंगने काढले पुन्हा डोके वर…
दांडेकर पूल भागात कोयता गँगची दहशत…
पुणे शहरात कोयता गँगने काढले पुन्हा डोके वर; पोलिसांनी काढली धिंड…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

