बकोरी डोंगराजवळील दारु अड्डा गुन्हे शाखाकडून उध्वस्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहराजवळ असलेल्या बकोरी डोंगराजवळील दारु अड्डा गुन्हे शाखाकडून उध्वस्त करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश यांचे सुचनेप्रमाणे गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीमध्ये २१/०६/२०२४ रोजी अवैध धंदे प्रतिबंधात्मक कारवाई कामी पेट्रोलिंग करीत होते. युनिटकडील पोलिस अंमलदार रमेश मेमाणे व नितीन धाडगे यांना बातमी मिळाली की, डोंगराजवळ, बकोरी रोड, वाघोली येथे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता काही व्यक्ती अवैधरित्या दारु विक्री करत आहेत. सदरची माहिती उल्हास कदम, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट- ६ पुणे शहर यांना कळवुन बातमी प्रमाणे जाऊन, सदर ठिकाणाचे आम्ही सर्वानी मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता, नमुद ठिकाणी पत्र्याचे शेडमध्ये व मारुती कंपनीच्या सिल्व्हर रंगाच्या वॅगनार कार मधून
१. कपिल शिवाली येलुरे वय ३० वर्षे रा. कोलते पाटील, आयव्ही इस्टेटजवळ, मोकळया जागेत पत्र्याचे शेडमध्ये, ड्रीम संकप्ल्प सोसायटी रोड, वाघोली, पुणे
२. प्रदीप गुलाब मुजमुले वय २७ वर्षे रा. कोलते पाटील, आयव्ही इस्टेटजवळ, मोकळया जागेत पत्र्याचे शेडमध्ये, ड्रीम संकप्ल्प सोसायटी रोड, वाघोली, पुणे
३. बाळु कटके रा. कटकेवाडी, वाघोली, पुणे हे अवैध रित्या दारु विक्री करत असताना मिळून आल्याने त्यांचे कब्जातील ७०,०००/- रु किं.ची. ७७० लिटर गावठी हातभट्टीची दारु व २,००,०००/- रु किं.ची मारुती कंपनीच्या सिल्व्हर रंगाच्या वॅगनार कार एम एच ०६ ए बी ००७० असा एकुण २,७०,०००/- रु. किं.चा मुद्देमाल जप्त करुन महाराष्ट्र प्रोव्हिबिशन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, प्रवीण पवार, पोलिस सह आयुक्त, पुणे शहर, शैलेश बलकवडे, अपर पोलिस आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे, पोलिस उपआयुक्त, गुन्हे, सतिश गोवेकर, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे -२, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलिस निरीक्षक उल्हास कदम, पोलिस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील विशाल अगरवाल याला जामीन; पण…

पुणे शहरात भानामती करीत असल्याचे संशयावरून लाखो रुपयांची सुपारी; तिघांना अटक…

१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!