पुणे शहरात चोरी करणाऱ्या सराईत टोळीप्रमुखासह साथीदारांना लष्कर पोलिसांनी केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात सराईत घरफोडी करणारा टोळीप्रमुख व त्याच्या साथीदारांना लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून एकुण १० मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

लष्कर पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर २७७/२०२४, भा. न्या. सं. कलम ३०५, ३३१(२), ३३१ (४) ३(५) मधील फिर्यादी रा. कोंढवा, पुणे यांचे मालकीचे सेल एक्स्प्रेस या नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान मरियम मंझिल, न्यु मोदिखाना कॅम्प, पुणे या ठिकाणी आहे. सदर दुकान ०३/१२/२०२४ रोजी रात्री बंद असताना दुकानाचे शटर उचकटुन चोरट्यांनी घर फोडी करून दुकानातील वनप्लस व ओपो कंपनीचे एकुण १० मोबाईल किंमत रूपये ४४,०००/- असा माल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता. चोरट्यांविरूध्द दि. ०३/१२/२०२४ रोजी लष्कर पो. स्टे. येथे वर उल्लेखीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरफोडी चोरी करणारे गुन्हेगारांबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसताना, वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली लष्कर पो. ठाणे कडील तपास पथकाचे पो अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील तसेच आजुबाजुचे परिसरातील सी सी टि व्ही फुटेज पडताळुन पाहणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातुन मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली व अथक प्रयत्नाने सापळा रचुन गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात आले आहे. सदर आरोपींची नावे
१) शाहरूख सलाउद्दीन खतीब, वय २४ वर्ष, रा. घर क्र. २०४, गल्ली क्र. २५, भाग्योदय नगर, किर्ती इमारतीसमोर, कोंढवा, पुणे,
२) सलिम हसन शेख, वय २४ वर्ष, रा. शेख अब्दुल रेहमान चौक, कासेवाडी, भवानीपेठ, पुणे,
३) सर्फराज पाशा शेख, वय २२ वर्ष, रा. शेख अब्दुल रेहमान चौक, कासेवाडी, भवानीपेठ, पुणे,
४) अजीम बबलु शेख, वय २० वर्ष, रा. भगवा चौक, कासेवाडी, भवानीपेठ, पुणे, अशी असुन ते आरोपी शहारूख खतीब हा पोलिसा अभिलेखावरील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यांचेवर एकुण ०५ घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडुन लष्कर पो. स्टे कडील दाखल गुन्ह्यातील एकुण ४४,०००/- रू. किंमतीचे वन प्लस व ओपो कंपनीचे एकुण १० मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा तपास पोलिस उप-निरिक्षक राहुल घाडगे, हे करीत आहेत.

संबंधित कामगीरी ही पोलिस उप आयुक्त परिमंडळ २, स्मार्तना पाटील, सहा. पोलिस आयुक्त लष्कर विभाग, दिपक निकम यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरिषकुमार दिघावकर, पोलिस निरिक्षक (गुन्हे) प्रदिप पवार, पोलिस उप निरिक्षक राहुल घाडगे यांचे नेतृत्वाखाली, तपास पथकातील पोलिस अंमलदार महेश कदम, सोमनाथ बनसोडे, संदिप उकिर्डे, रमेश चौधर, सचिन मांजरे, लोकेश कदम, हराळ, कोडिलकर, महिला पोलिस अंमलदार अल्का ब्राम्हणे यांनी केली आहे.

पुणे शहरात पोलिसकाकाच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या…

पुणे! वडिलांना ‘टकल्या’ म्हणाला म्हणून दगडाने ठेचून केला खून…

पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास केले जेरबंद…

पुणे शहरात पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून मारहाण केलेल्या युवकाचा मृत्यू…

Video: पुणे शहरात लाखो रुपयांचे अंमली पदार्थ व पिस्टल जप्त…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!