क्लास वन अधिकारी अन् सासऱ्याची सुपारी; कसा उलगडा झाला पाहा…

नागपूरः क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेनेच 300 कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी आपल्या सासऱ्याच्या खुनाची सुपारी दिली आणि हत्या घडवून आणल्याची घटना घडली आहे. आपल्याच ड्रायव्हरला एक कोटी रुपये देऊन तिने सासऱ्याचा काटा काढला आहे. सुरवातीला अपघात दिसणाऱ्या या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि हा गु्न्हा उघडकीस आला.

पुरुषोत्तम पुट्टेवार (वय 82, रा. नागपूर) असे मृत सासऱ्याचे नाव आहे. पुरुषोत्तम पुट्टेवार हे 22 मे रोजी आपल्या घराबाहेर पडले. हातात एक पिशवी घेऊन ते रस्त्याच्या कडेने चालत होते. त्यावेळी एक भरधाव कारने पुरुषोत्तम यांनी चिरडले होते. सुरवातीला ही घटना हिट अँड रन प्रकरण वाटले होते. पण, पोलिसांना संशय आला आणि घटना उघडकीस आली.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

दरम्यान, अपघात नसून हत्या होती हे कसं समोर आलं? याचा उलगडा आता झाला आहे. हत्येची सुपारी एका भुरट्या गुन्हेगाराला देण्यात आली होती. त्यासाठी जुनी कार खरेदी केली होती. यासाठीही पुरुषोत्तम यांचू सून अर्चना हिने पैसे दिले होते. पोलिसांनी तपास करून सत्य सर्वांसमोर आणलेच. त्याला कारणीभूत ठरल्या काही पार्ट्या. कधी कोणत्याही मित्राला दारू न पाजणारा, कधी ही मित्रांना पार्ट्या न देणारा आणि नेहमीच लोकांकडून पैसे उसने मागणारा नीरज निमजे अचानक मित्रांना पार्ट्या देऊ लागला, दारूचे महागडे ब्रँड ऑफर करू लागला. त्यामुळे काही जणांना त्यांच्यावर शंका आली होती.

खबऱ्यांमार्फत नीरज निमजेकडे अचानक भरपूर पैसा आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. पोलिसांनी निरजच्या अवतीभवती आणखी खबरे पेरले. एका अपघाताच्या प्रकरणातून नीरज निमजेकडे भरपूर पैसे आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांनी माहिती घेणे सुरू केले. तेव्हा बालाजीनगर भागातील पुरुषोत्तम पुट्टेवार यांचे प्रकरण समोर आले.

पोलिसांनी नीरज निमजे याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला आणि पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू अपघाती नसून सुनियोजित हत्या केल्याची कबुलीच नीरज निमजेने दिली. त्यामुळे एका भुरट्या गुन्हेगाराने दिलेल्या काही महागड्या पार्ट्या अपघातातून घडवलेल्या हत्येचा प्रकरण सर्वांसमोर आणण्यासाठी कारणीभूत ठरल्या. पुरुषोत्तम यांची हत्या अंधश्रद्धेतून आणि त्यांच्या संपत्तीसाठी झाल्याची माहिती समजते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेने संपत्तीसाठी काढला सासऱ्याचा काटा…

मुंबई विमानतळावर महिलांची सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारी चक्रावले…

प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या बापाने केली मुलाची हत्या…

संतापजनक! बापाने चिमुकलीला जमीनीवर जोरात आपटून मारले…

महाराष्ट्र हादरला! प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून केला खून…

पुणे पोर्श कार अपघात प्रकरण! विशाल अगरवाल याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!