
पुणे! निलेश घारेकडून स्वत:च्याच कारवर गोळीबाराचा डाव; कारण…
पुणे : शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश घारे यांनी स्वतःच्या गाडीवर गोळीबाराचा डाव रचल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. पोलिस संरक्षण मिळावे आणि शस्त्र परवाना मिळावा यासाठी स्वतःच्या गाडीवर त्यांनीच गोळीबार घडवून आणला होता.
पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’
पुणे शहरातील वारजे माळवाडी भागात 19 मे रोजी घारे यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याच्या घटनेने राजकीय वर्तुळात आणि पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. कारण, निरलेश घारे हे पुणे जिल्ह्याचे शिवसेनेच्या युवासेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. याप्रकरणी, पोलिसांनी जलद गतीने तपासाची चक्रे फिरवून तीन आरोपींना पुण्यातून अटक केली आहे. या अटकेनंतर फिर्यादी घारे यांनी स्वत:च गोळीबाराचा बनाव रचल्याची माहिती तपासातून उघड झाली.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
वारजे माळवाडी भागात 19 मे रोजी रात्री 12 वाजता पुणे जिल्हा युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला होता. निलेश घारे यांचे येथील गणपती माथा परिसरामध्ये जनसंपर्क कार्यालय आहे. सोमवारी ते आपल्या कार्यालयात सहकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. सुदैवाने घारे त्यांच्या गाडीत नसल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. तसेच, सुदैवाने यात कोणी ही जखमी झाला नव्हते. याप्रकरणी, वारजे पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकं या प्रकरणाचा तपास करत होते.
वारजे पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा वारजे भागातून 3 जणांना ताब्यात घेतले असता त्यांनी हा सगळा प्रकार घडवून आणल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे निलेश घारे यांनी हा गोळीबार करायला लावल्याचा धक्कादायक खुलासाही त्यांनी केला. सचिन गोळे, शुभम खेमणार आणि अजय उर्फ बगली सकपाळ असे अटक केलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संकेत मातले हा फरार असून वारजे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
दरम्यान, निलेश घारे यांनी याआधी वारजे पोलिस ठाण्यात शस्त्र परवाना मिळावा, यासाठी अर्ज केला होता. मात्र, तो रद्द करण्यात आला होता. शस्त्र परवाना मिळावा तसेच आपण जिल्हाध्यक्ष असल्याने पोलिस संरक्षण मिळावे यासाठी त्यांनीच हा गोळीबार घडवून आणला आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पुणे शहरात शिंदे गटाच्या नेत्याच्या कारवर मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार…
पुणे शहरातील मध्यवर्ती भागात पहाटेच्या सुमारास गोळीबार…
Cyber Crime! पुणे शहरात सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस…
Video: पुणे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींची काढली वरात…
पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…
Video: पुणे शहरात धुमाकूळ घातलेल्या कोयता गँगची पोलिसांनी काढली वरात…

