धक्कादायक Video: पहाटेच्या सुमारास महिलेला पाठीमागून येऊन मारली मिठी…

बंगळूरू (कर्नाटक): एक महिला पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडली होती. मैत्रिणीच्या घराबाहेर वाट पाहात असताना एकाने पाठीमागून येऊन महिलेला मिठी मारून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

एक महिला नेहमीप्रमाणे सकाळी 5 वाजता मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडली होती. एका जागी उभी राहून मैत्रिणीची वाट पाहात असताना पाठीमागून एक व्यक्ती आला आणि विनयभंग केला. महिलेसोबत झालेल्या गैरवर्तनाची ही घटना शेजारी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महिला स्वत:ला वाचवण्यासाठी त्या व्यक्तीच्या तावडीतून पळून जाते. मात्र, तो व्यक्ती महिलेच्या मागे धावत येतो. एका ठिकाणी पोहोचल्यानंतर महिलेला पकडतो आणि तिच्यावर जबरदस्ती करतो. यादरम्यान तो महिलेचे तोंड दाबून अश्लिल कृत्य करताना दिसत आहे. महिलेने जोरजोरात आरडाओरडा सुरू केल्यावर शेजारील लोकांचा आवाज ऐकून संबंधित व्यक्ती पळून गेला. महिलेच्या तक्रारीवरून कोननकुंटे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन आसपासच्या लोकांकडून माहिती गोळा केली. याप्रकरणी डीसीपी दक्षिण लोकेश जगलासर यांनी सांगितले की, पीडित महिलेने कोननकुंटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

Video: यशश्री शिंदे हत्याप्रकरणाच्या पोलिसांनी दाऊदला घटनास्थळी नेले अन्…

प्राध्यापकाने सहकारी महिला प्राध्यापिकेचा केला विनयभंग…

महिलेचा पाठलाग, शिवीगाळ करणे आणि ढकलणे हा विनयभंग नाही…

सरपंचाने केला शौचालयास गेलेल्या महिलेचा विनयभंग…

Video: लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग…

धक्कादायक! डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या महिलेचा केला विनयभंग…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!