युवकांचा ‘ड्रग्ज पार्टी’ व्हिडिओ पोलिस आयुक्तांनी पाहिला अन्…

औरंगाबादः औरंगाबादच्या युवकांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात एक पार्टी केली. पार्टीमध्ये युवक गांजा आणि चरसच्या माध्यमातून नशा करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर औरंगाबादचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी सापळा लावला होता. युवकांना गांजा, चरस आणि एमडी सारखे नशेली पदार्थ पुरवणाऱ्या एकाला बेड्या ठोकल्या आहे. अनिल माळवे (वय 51) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तांच्या पथकाने अचानकपणे शहरातील चार ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी साडेतीन किलो गांजा, 1.2 ग्रॅम एमडी, 4.5 ग्रॅम चरस जप्त केला आहे.पोलिसांनी रेकोर्डवरील गुन्हेगार अनिल माळवे याला अटक केली आहे. माळवे याच्यावर शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात 16 गुन्हे दाखल आहेत. माळवे उच्चभ्रू तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना गांजा, चरस अशा नशेचे पदार्थ पुरवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांना त्याच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणारे पदार्थ ताब्यात घेण्यात आले आहे.

औरंगाबाद शहर पोलिसांनी छापेमारी करत अटक केलेला माळवे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. उच्चभ्रू युवकांना तो आपल्या जाळ्यात ओढून नशेचे साहित्य तो उपलब्ध करून असे. पोलिसांनी नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाला विश्वासात घेऊन नशेसाठी साहित्य पुरवणाऱ्या व्यक्तीची माहिती काढली आणि माळवे याचे नाव समोर आले. पोलिसांनी वेगवेगळ्या चार ठिकाणी छापेमारी केली आणि माळवेला ताब्यात घेतले. युवकांना नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या आणि नशेचे साहित्य विकणाऱ्यांवर धडक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!