
हृदयद्रावक! बहिणीकडून राखी बांधल्यानंतर भावाने संपवले जीवन; भावनिक मेसेज व्हायरल…
जळगाव : ‘सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको, मी जातो’ असा भावनिक मेसेज सोशल मीडियावर बहिणीला पाठवून भावाने गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे. रोहित साहेबराव धनगर (वय १७) असे या मृत भावाचे नाव आहे. ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे हरल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या घटनेने जळगावात मोठी खळबळ उडाली आहे.
रोहित हा अकरावीत कला शाखेत शिकत होता. रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी तो आपल्या वडिलांसोबत आत्याच्या घरी गेला होता. तिथे मोठ्या उत्साहात बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर तो वडिलांची दुचाकी घेऊन जुना आसोदा रोड परिसरातील स्वतःच्या घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर (Instagram) बहिणीसोबतचा फोटो अपलोड करत ‘हॅपी रक्षा बंधन ताई… सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको, मी जातो’ असा भावनिक संदेश लिहिला.
View this post on Instagram
रोहितने इन्स्टाग्रामवर आणखी एक भावूक स्टेटस ठेवले होते. त्यात त्याने लिहिले होते की, “अगली बार आऊंगा तो सबका मनपसंद बनके आऊंगा, जो दाग रह गये उन्हे मिटाके आऊंगा, ना मेरी आखे नम होगी ना दिल मे कोई गम लेके आऊंगा! शुक्रिया…” याशिवाय, ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावल्याचे सांगणारा एक व्हिडिओ त्याने आपल्या मित्राला पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
रोहितचे हे मेसेज आणि स्टेटस पाहताच त्याच्या मित्रांना धक्का बसला. मित्रांनी तातडीने त्याच्या घराच्या दिशेने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत रोहितने घरात गळफास घेतला होता. मित्रांनी आणि कुटुंबीयांनी त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेले, परंतु तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रक्षाबंधनासारख्या आनंदाच्या दिवशीच ऐन उमेदीच्या मुलाने जगाचा निरोप घेतल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! मुलगा आणि पती दरीत कोसळल्याचे पाहून आईनेही मारली उडी…
हृदयद्रावक! नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू…
हृदयद्रावक! मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यूनंतर पत्नीनेही संपवलं जीवन, चिमुकल्या झाल्या पोरक्या…
हृदयद्रावक! माहेरी जाताना नववधूचा भीषण अपघातात मृत्यू…
हृदयद्रावक! घरात मुलीच्या बारशासाठी लगबग अन् मातेने कवटाळले मृत्यूला…

