
कोल्हापूरमध्ये प्रेमविवाहाचा भयानक शेवट; संशयावरून पत्नीला संपवलं अन् मारला मिशीवर ताव…
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यात असणाऱ्या पेठवडगाव शहरात बुधवारी (ता. ८) एक संतापजनक घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून एकाने पत्नीचा भररस्त्यात, गजबजलेल्या बाजारपेठेत कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केला. भर पावसात घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. पत्नीच्या हत्येपूर्वी आरोपीने मोबाईलवर व्हाट्सअप स्टेटस ठेवून हत्येचा इशारा दिला होता.
अमृता दीपक कांबळे (वय 30) असे मृत महिलेचे नाव तर दीपक लाडू कांबळे (वय 35, रा. सावर्डे, ता. हातकणंगले) असे आरोपीचे नाव आहे.
बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अमृता दीपक कांबळे या एसटी स्टँडच्या पाठीमागील एका कॉम्प्लेक्समध्ये वकिलाला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्याचवेळी दीपक तिथे पोहोचला आणि दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाले. दीपकने आपल्याजवळील धारदार कोयत्याने अमृता यांच्यावर हल्ला चढवला. त्याने अमृता यांच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले, ज्यामुळे त्या रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळल्या. पावसाची संततधार सुरू असतानाच घडलेल्या या घटनेने परिसरात रक्ताचा सडा पडला होता.
View this post on Instagram
दरम्यान, काही धाडसी तरुणांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, दीपकने ‘ती माझी पत्नी आहे, तुम्ही यात पडू नका,’ असे ओरडून त्याने मध्यस्थी करणाऱ्यांना दूर सारलं आणि अमृता यांच्यावर पुन्हा वार केले. त्यानंतर ‘विषय संपवला’ असे म्हणत आणि मिशीवर ताव मारत घटनास्थळावरून तो फरार झाला. अमृता आणि दीपक यांचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन लहान मुली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दीपक अमृताच्या चारित्र्यावर संशय घेत होता. अखेर प्रेमविवाहाचा शेवट झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख चौधरी, उपनिरीक्षक प्रियांका खाडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. फरार आरोपी दीपक कांबळे याच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास वडगाव पोलीस करत आहेत.
पुणे! प्रेमविवाह केल्यानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध पत्नीला समजले अन्…
सांगली! प्रेमविवाहानंतर रात्रीच्या सुमारास दुसऱ्या प्रियकराला घरी बोलवलं अन्…
पुणे! आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; सोशल मीडियावर ओळख; प्रेमविवाह अन्…
प्रेमविवाहानंतर पत्नी निघून गेली अन् भाऊ पोहचेपर्यंत सगळं संपलं होतं…
प्रेमविवाहानंतर पत्नीने अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ पाहिला अन्…

