पत्नी आणि चिमुकली झोपली असताना घरात सोडला कोब्रा…

भुवनेश्वर (ओडिशा): गंजाम जिल्ह्यात 7 ऑक्टोबर रोजी एक महिला आणि तिची दोन वर्षांची मुलगी त्यांच्या घरात सर्पदंशामुळे मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. महिलेच्या पतीने घरात विषारी साप सोडला होता, त्याच्या दंशामुळे दोघींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे.

गंजाम जिल्ह्यातील कबिसूर्यनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अधेइबाराग गावात ही घटना घडली आहे. के गणेश पात्रा असे आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, के गणेश पात्रा याने त्याच गावातील बसंती पात्रासोबत तीन वर्षांपूर्वी लग्न केले होते. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली होती. गणेशला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याने पत्नी आणि मुलीच्या हत्येचा कट रचला होता. गणेशने एका सर्पमित्राशी संपर्क साधून एक विषारी कोब्रा विकत घेतला. पत्नी आणि मुलगी झोपली असताना 7 ऑक्टोबर रोजी त्यानी कोब्रा साप घरात सोडला होता. दोघींनाही सापाने चावा घेतला. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर बसंती आणि दोन वर्षांच्या मुलीला हिंजिलिकट येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केले. दोघींची हत्या झाल्याचा संशय बसंतीच्या कुटुंबीयांनी व्यक्त करत जावई गणेशविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

घटनेच्या रात्री कुटुंबीयांनी सापाला मारले होते. त्याचवेळी, महिला आणि तिच्या मुलीच्या पोस्टमॉर्टम अहवालातही सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. गणेशचीही चौकशी करण्यात आली. यावेळी गणेशने पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

गौतमी पाटील हिच्या नृत्याच्या कार्यक्रमात शिरला साप अन्…

सापावर पाय पडल्याच्या भीतीनंतर चिमुकल्याचा घाबरुन मृत्यू…

हृदयद्रावक! पोत्यात साप समजून कोणी जवळ जात नव्हते, पण…

मुलीला साप चालवल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!