लोणीकंद परिसरातील ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश…

पुणे (संदीप कद्रे): लोणीकंद परिसरातील ‘सेक्स रॅकेट’चा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, बांगलादेशी युवतीसह ६ जणींची सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

युवतींना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करुन घेणार्‍या टोळीचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दापाश केला आहे. लोणीकंदमधील हॉटेल मनोरा येथे पथकाने छापा टाकून ६ युवतींची सुटका केली. याप्रकरणी दोघा मॅनेजरांना अटक केली आहे. प्रज्योत हिरीआण्णा हेगडे (वय २७, रा. पेरणे फाटा) आणि गिरीश शाम शेट्टी (वय २९, रा. पेरणे फाटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

लोणीकंदमधीस हॉटेल मनोरा येथे मुलींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. सामाजिक सुरक्षा विभागाने तेथे बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. हॉटेलमध्ये ६ युवतींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांना दोघा मॅनेजरांना अटक केली. संबंधित कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, एपीआय अश्विनी पाटील, अजय राणे, मनीषा पुकाळे, हणमंत कांबळे, किशोर भुजबळ, इम्रान नदाफ, रेश्मा कंक यांनी केली आहे.

पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…

लोणीकंद पोलिसांनी वेशांतर करून पीएमपीएल बसमध्ये चोरी करणाऱ्यास पकडले…

लोणीकंद पोलिसांनी ‘व्यसनमुक्ती व महिला सुरक्षे’साठी केले ७६ किमी दौड…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!