पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथील तारांकित हॉटेलमध्ये परदेशी युवतींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी करण ऊर्फ रामू किशोर यादव (वय ३५, रा. स्काय लाईट सोसायटी, वाघोली) याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

सामाजिक सुरक्षा विभागातील महिला अंमलदारांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५६६/२३) दिली आहे. हा प्रकार कल्याणीनगर येथील रॉयल ऑर्चिड गोल्डन सुट या हॉटेलमध्ये सुरु असल्याची माहिती पोलिस अंमलदार सागर केकाण आणि तुषार भिवरकर यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी रॉयल ऑर्चिड गोल्डन सुट या हॉटेलवर छापा टाकून एका उझबेकिस्तानी युवतीला पकडले. तेथेच करण यादव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर रॉयल ऑर्चिड सेंटल या हॉटेलमध्येही एका उत्तर प्रदेशातील तरुणीकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी तेथून एका युवतीला ताब्यात घेतले. वेश्या व्यवसायातून मिळालेले २५ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले असून, दोघी युवतींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

संबंधित कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, एपीआय राजेश माळेगावे, एपीआय अश्विनी पाटील, पोलिस हवालदार अजय राणे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, पोलिस अंमलदार सागर केकाण, तुषार भिवरकर, अमेय रसाळ, अमित जमदाडे, संदीप कोळगे, किशार भुजबळ, ओंकार कुंभार, इरफान पठाण आणि महिला पोलिस रेश्मा कंक यांच्या पथकाने केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!