
सहकारनगर पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील सामान्य जनतेचा, पक्षी-प्राण्यांचा जीवघेणा ठरणा-या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
पुणे शहरात नववर्ष आगमन व संक्रात सण मोठ्या उत्सहात साजरा होतो त्या निमीत्त मोठ्याप्रमाणात आकाशात पतंग उडविले जातात. परंतु, त्यासाठी घातक असा नायलॉन मांजा वापरण्यात येतो. नायलॉन मांजामुळे रोडवरून जाणा-या सामान्य नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत तर कित्येक वेळा प्राणही गमवावे लागले आहे. झाडांमध्ये आडकलेल्या माज्यामुळे कित्येक वेळा पक्षांचे जिव धोक्यात आले आहेत. नायलॉन मांजावर न्यायालयाने बंदी घातलेली आहे. परंतु, तरीही काहीजण अशा नायलॉन मांजाची बेकायदेशीर रित्या चोरून विक्री करतात त्याअनुशंगाने नायलॉन मांजाची चोरून विक्री करणा-या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहेत.
सहकारनगर पोलिस स्टेशन कडील अधिकारी व पोलिस अंमलदार हद्दीत २७/१२/२०२३ रोजी पेट्रोलींग करत होते. पोलिस अंमलदार अमोल पवार यांचे बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, पुणे सातारा रोडवरील पंचवटी इमारती पाठीमागील कॅफे पिटर हॉटेल जवळ फुटपाथवर धनकवडी पुणे येथे एक जण शासनाने बंदी घातलेल्या घातक अशा पतंगाचे नायलॉन मांजाची बंडले विक्री करण्याकरिता आला अशी माहिती प्राप्त होताच सहकारनगर पोलिस स्टेशन कडिल पोलिस निरीक्षक गुन्हे संदीप देशमाने यांचे सुचनांप्रमाणे तपासपथका कडील पोलिस उपनिरीक्षक राहुल खंडाळे व अंमलदार यांनी कॅफे पिटर हॉटेल धनकवडी जवळील परिसरात जावून मिळालेल्या बातमीच्या आधारे इसम नामे वेदांत राकेश गाढवे (वय १९ वर्षे, धंदा शिक्षण, रा. रुम नं.१६, गल्ली नं.२, शंकर महाराज वसाहत, धनकवडी पुणे) यास ०४/२० वा ताब्यात घेवून त्याचे ताब्यातील पोत्याची झडती घेता त्यां घरामध्ये किं रू ४,४००/- चा नायलॉन मांजा विक्री करीता बाळगलेला मिळून आल्याने सदरचा मांजा जप्त करून वेदांत राकेश गाढवे, याचे विरूध्द सहकारनगर पोलिस ठाणे गु.र.नं. ३५३ / २०२३ भा. दं. वि. कलम १८८,३३६ पर्यावरण संरक्षण कायदा सन १९८६ चे कलम ५१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ – २, स्मार्तना पाटील, सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, संदीप देशमाने पोलिस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहा.पोउपनिरी बापु खुटवड, पोलिस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, विशाल वाघ, भुजंग इंगळे, निलेश शिवतरे, सुशांत फरांदे, सागर सुतकर, बजरंग पवार, नवनाथ शिंदे, सागर कुंभार यांनी केली आहे.

सहकारनगर पोलिसांनी दोन सराईत गुंडांना केले जेरबंद…
पुणे शहरात पोलिसांसमोरच कोयता गँगने युवकांवर केला हल्ला…
येरवडा कारागृहात कैद्याचा निर्घृण खून; कसा केला पाहा…
‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याच्या भावाने केली आत्महत्या…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०५वी कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

