हृदयद्रावक! दीड वर्षांची चिमुकली अन् सहा महिन्यांची गर्भवती…

छत्रपती संभाजीनगर : एका गर्भवती महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. अलका पवन मुटकेर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. अलका यांना एक दीड वर्षांची मुलगी आणि सहा महिन्यांच्या त्या गर्भवती होत्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अलका यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या वडिलांना फोन केला होता. वडील त्यांना घ्यायला सासरी येणार होते, मात्र त्यापूर्वीच टोकाचे पाऊलं उचलले. पती सतत दारू पिऊन छळ करायचा, वारंवार विनंती करूनही त्याचे विवाहबाह्य संबंध थांबले नाहीत. हे कृत्य नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर थांबवण्याचे त्याने कबूल केले होते. मात्र, त्रास कमी झाला नाही. शेवटी कंटाळून 6 महिन्यांची गर्भवती असलेल्या अलका यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पती मध्यरात्री दोन वाजता घरी परतल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. आत्महत्येपूर्वी अलका यांनी आपल्या वडिलांना कॉल केला होता. वडील मुलीला घेऊन जाण्यासाठी येणार होते. मात्र, अलका यांनी त्यापूर्वीच जगाचा निरोप घेतला. या प्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात महिलेच्या पतीसह त्याच्या भावाला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-नवरीचा अपघाती मृत्यू…

हृदयद्रावक! पुणे-सोलापूर महामार्गावर दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू…

हृदयद्रावक! पतीचा मृत्यूनंतर मुलाला विष पाजून घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! पत्नी व दोन मुलांचे मृतदेह आणण्याची वेळ आली बापावर…

हृदयद्रावक! गरोदर महिलेची आत्महत्या; पोटातील बाळही दगावले…

हृदयद्रावक! गरोदर अभिनेत्रीने बाळाला न पाहताच घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! आईच्या मृतदेहाला चिकटून रात्रभर रडत राहिला चिमुकला…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!