… ‘त्या’ आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल!

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी पारित केलेल्या आदेशाविरुद्ध कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे (रा. आमडी), दि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पांढरकवडा विभागीय अध्यक्ष तथा संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष सुरेशबाबू लोणकर (रा. शिरोली), गुणवंत लेनगुरे (रा. मानोली), आशिष भोयर (रा. अंजी (नृसिंह)), कैलास कोरवते (रा. शिरोली), अकबर तंवर (रा. घाटंजी), अरविंद जाधव (रा. घाटंजी) व रमेश डंभारे (रा. आमडी) आदींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका क्रमांक WO/24716/2023 दाखल केली आहे. याचिकाकर्ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक ठाकरे, आशिष सुरेशबाबू लोणकर व इतर संचालकातर्फे ॲड. अक्षय नाईक उच्च न्यायालयात काम पाहत आहे. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 4 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.

यवतमाळ येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे नानासाहेब चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्राधिकृत अधिकारी एस. व्ही. कुडमेथे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन अशोक कोठारी (रा. भांबोरा ता. घाटंजी) व उपसभापती सचिन देशमुख पारवेकर (रा. पारवा ता. घाटंजी) विरुद्ध विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांचे कडे अपील दाखल केले होते. मात्र, दाखल केलेले अपील महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 22 (4) अन्वये विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेचे (अमरावती) व्ही. डी. कहाळेकर यांनी खारीज केले. प्रतिवादी नितीन कोठारी, सचिन देशमुख पारवेकर यांचेतर्फे ॲड. एस. एन. गट्टानी (अमरावती) यांनी काम पाहिले होते.

या पुर्वी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) 1963 चे कलम 22 (4) अन्वये यवतमाळ सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे व इतर संचालकांचे अपील 8 जुन 2023 रोजी फेटाळले होते. सदर निकालाच्या विरोधात व्यथित होऊन 9 जुन 2023 रोजी अमरावती येथील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेकडे अपील दाखल करण्यात आले. या प्रकरणात प्रतिवादी तर्फे ॲड. एस. एन. गट्टानी यांनी वकीलपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली. अपील क्रमांक 6/2023 व अपील क्रमांक 7/2023 प्रकरणातील मुद्दे सारखेच असल्याने सदर प्रकरणात एकत्रित आदेश पारित करण्यात आला. बाजार समितीची उपविधी 41 (1) नुसार कोणत्याही तीन सदस्यांनी मागणी केल्यास गुप्त मतदान घेता येते. तसेच वरील बाबी लक्षात घेऊन अपीलार्थीचे अपील मान्य करता येणार नाही. त्यामुळे सदरचे अपील महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) 1963 चे कलम 22 (4) अन्वये झालेल्या प्राप्त अधिकारानुसार अपीलार्थी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे व इतर संचालकांचे अपील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेचे (अमरावती) व्ही. डी. कहाळेकर यांनी खारीज केले होते. या निकालामुळे घाटंजी तालुक्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ माजली होती.

दरम्यान, घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष सुरेशबाबू लोणकर यांची प्रतिक्रिया घेतली असता, अमरावती येथील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी दिलेला निकाल नियमाला धरुन नाही. तसेच सदरचा निकाल हा चुकीचा देण्यात आला असुन राजकीय दबावाखाली पारीत करण्यात आला आहे. सदरचा निकाल नियमबाह्य असल्याने आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाकडुन योग्य ते न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. याचिकाकर्ते अभिषेक ठाकरे व इतर संचालकाची बाजू ॲड. अक्षय नाईक उच्च न्यायालयात मांडणार आहे.

घाटंजी, कुर्ली येथील फसवणूकीचे प्रकरण अगोदर पोलिस ठाण्यात; नंतर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!