पुणे शहरातील जबरी चोरीप्रकरणी तिघांना अटक; मुद्देमाल जप्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सिंहगडरोड पोलिस स्टेशन येथील जबरी चोरीच्या दाखल असलेल्या गुन्ह्यातील ०३ आरोपी व एक विधीसंघर्षीत बालकाला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

गजानन ज्वेलर्स, रेणुकानगरी, वडगाव बु. पुणे या सराफ दुकानामध्ये ०१/०७/२०२५ रोजी अनोळखी चोरट्यांनी प्रवेश करून, दुकानदार महिला फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देश्याने त्यांच्या डोक्यात व डावे हाताचे दंडावर लोखंडी हत्याराने वार करून, त्यांना गंभीर जखमी केले. दुकानाचे कपाटाचे काचा लोखंडी हत्याराने फोडून, कपाटामधील किंमत रुपये ४,५०,०००/-रू. किं.चे ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले व पळून जातेवेळी त्यांच्या हातामधील पिस्तोल व लोखंडी हत्यार हवेत फिरवत लोकांमध्ये दहशत निर्माण करीत निघून गेले. सदर घटनेबाबत फिर्यादी यांच्या फिर्यादीवरून सिंहगड रोड पोलिस स्टेशन गु. रजि. नं. ३२९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३११, ३(५), सह भारतीय हत्यार कायदा कलम ३.४(२५) सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७(१) सह १३५ क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

सदर घटनेनंतर तात्काळ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील युनिट १, २, ३ तसेच खंडणी विरोधी पथक व दरोडा वाहन चोरी विरोधी पथक यांनी घटनास्थळास भेटी देऊन संमातर तपास सुरू केला. तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट ०३ व नांदेड सिटी डिबी पथक यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपींची ओळख पटवून आरोपी निष्पन्न करून नमूद गुन्ह्यातील विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन शाईन कंपनीची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे व त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील पाहिजे आरोपी बाबत माहिती काढून गुन्हे शाखा युनिट ०३ चे पथक व सिंहगड रोड पोलिस स्टेशनचे पथक हे अहमदनगर या ठिकाणी रवाना करून गुन्ह्यातील उर्वरित ०३ आरोपी
१) वरदन संजय खरटमल वय २० वर्ष रा शांताईनगर पठार वस्ती, कुदळेचाळ, वडगाव बा. पुणे
२) अमर हनुमंत बाभळे वय २० वर्ष रा आशाताई निवास समोर, उत्कर्ष शाळेच्या पाठीमागे, धबाडी, वडगाव बा, पुणे
३) ओकांर रवि शिंदे वय २२ वर्ष रा. मानाजीनगर, विघ्नहर्ता हाईटस, प्लॅट नंबर २, नन्हे, पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी करून नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेला खालील वर्णनाचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे.
१) १,३५,०००/- रुपये किमतीची ०१ सोन्याची चैन वजन अंदाजे १५ ग्रॅम डिझाईन असलेली
२) ९०,०००/- रुपये किमतीची ०१ सोन्याची चेन वजन अंदाजे १० ग्रॅम
३) १,३५,०००/- रुपये किमतीची ०३ सोन्याची चैन प्रत्येकी वजन ०५ ग्रॅम ४) ९०,०००/- रुपये किमतीची ०१ नेकलेस वजन अंदाजे १० ग्रॅम

सदरची कामगिरी ही अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, पोलिस सह आयुक्त, पंकज देशमुख, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, विवेक मासाळ, पोलिस उप-आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, (अति. कार्य. गुन्हे शाखा), संभाजी कदम, पोलिस उप आयुक्त, परीमंडळ-०३, गणेश इंगळे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे १, अजय परमार, सहा पोलिस आयुक्त, सिंहगडरोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, गुन्हे शाखा, युनिट – ३, पोलिस निरीक्षक संखे, पोलिस निरीक्षक भोस, नांदेड सिटी पो स्टे, पोलिस निरीक्षक दायंगडे, सिंहगड रोड पो स्टे, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, प्रविण काळुखे, सचिन यादव, पोलिस उप-निरीक्षक फरताडे, भांडवलकर, सपोफौ पंढरीनाथ शिंदे, पो. हवा. १९८ कैलास लिम्हण, पो. हवा. ७५६९ किशोर शिंदे, पो. हवा. ८३६ अतुल साठे, पो हवा ५७५३ तुपसौंदर, पो हवा ८१२२ शिनगारे पो हवा ७३५१ बोडरे, पो. हवा. २८८ ताजणे, पो ना ५७९१ वेगरे, पो. शि. ८६०६ पुरषोत्तम गुन्ल्ला, पो. शि. ९१०४ तुषार किंद्रे, पो. शि. १०२१५ स्वप्निल मगर, पो. शि. ८७३२ कारके पो शि ०३ मोहिते, पोशि ८२९७ झगडे, पो.शि. ८६०० चव्हाण, पो.शि. ८८२३ माळवदकर, पोशि ९१५६ मोरे, पोशि ९१९१ क्षीरसागर यांचे पथकाने केली आहे.

पुणे! कुरिअर बॉय अत्याचार प्रकरणात ट्विस्ट, आरोपी निघाला…

पुणे हादरलं! कुरिअर बॉय असल्याचे सांगून युवतीच्या तोंडावर स्प्रे मारून केला बलात्कार…

IT कर्मचाऱ्याने महिला सहकाऱ्यांचा चोरून बनवला व्हिडिओ; मोबाईलमध्ये क्लीप…

पुणे! भोंदूबाबाच्या आश्रमातून वेगवेगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या जप्त…

ऑफिस पार्टीत युवतीने केले मद्यसेवन अन् सहकाऱ्याने केला बलात्कार…

पुणे शहरात चिमुकलीवर लॉजवर बलात्कार; आरोपीसह लॉज मालकही अटकेत…

पुणे! विद्येच्या माहेरघरात युवतीवर केला बलात्कार…

पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….

पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…

पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!