
पुणे हादरलं! कुरिअर बॉय असल्याचे सांगून युवतीच्या तोंडावर स्प्रे मारून केला बलात्कार…
पुणे: पुणे शहरातील कोंढवा भागात असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी (ता. २) रात्री धक्कादायक घटना घडली आहे. एका 25 वर्षीय युवतीवर कुरिअर बॉय असल्याचे भासवून आलेल्या व्यक्तीने बलात्कार केला आहे.
स्वारगेट प्रकरण! आरोपी दत्ता गाडे याने 22 हजार वेळा पाहिले अश्लिल व्हिडीओ…
पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील घटनेची अजूनही चर्चा सुरू आहे. या घटनेनंतर पुण्यासह राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता कोंढावा भागातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. घटनेच्या वेळी पीडिता ही घरात एकटीच होती. आरोपीने कुरिअर बॉय असल्याचे सांगत सोसायटीत प्रवेश केला. पीडित महिलेने “कुरिअर माझं नाही” असे स्पष्ट सांगितल्यानंतरही, आरोपीने ‘सही तर करावीच लागेल’ असे म्हणत तिला दरवाजा उघडण्यास भाग पाडले.
महिलेने सेफ्टी डोअर उघडताच, आरोपीने तिच्या तोंडावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केला. संपूर्ण प्रकार घडून गेल्यानंतर आरोपीने पीडितेचा मोबाईल हातात घेत त्यात स्वतःचा सेल्फी काढला आणि “मी परत येईन” असा मेसेज टाईप करून ठेवला. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. या घटनेनंतर कोंढवा परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी लवकरात लवकर गजाआड करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
पोलिसांच्या 10 टीम त्याचा तपास करत आहे. पीडित युवती आपल्या भावासोबत कोंढव्यात राहते. तरुणी मूळची अकोल्याची आहे. ती पुण्यातील कल्याणी नगरमधील कंपनीत काम करते, अशी माहिती देखील पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली. उच्चभ्रू व सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीत घटना घडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मोठे प्रश्न उपस्थित झाले आहे. आरोपीने अतिशय हुशारीने कुरिअर बॉयचे भान ठेवत गेट पार केला. सुरक्षारक्षकांकडून त्याची फारशी चौकशी झाली नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आरोपीचे ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
पुणे शहरात चिमुकलीवर लॉजवर बलात्कार; आरोपीसह लॉज मालकही अटकेत…
पुणे! विद्येच्या माहेरघरात युवतीवर केला बलात्कार…
पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….
पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…
पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

