
पुणे! भोंदूबाबाच्या आश्रमातून वेगवेगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या जप्त…
पुणे : अंधश्रद्धेचा फायदा घेत भक्तांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाची हायटेक विकृती समोर आली. प्रसाद दादा ऊर्फ बाबा ऊर्फ प्रसाद तामदार (वय 29, रा. सूस गाव, मुळशी) याला बावधन पोलिसांनी अटक केल्यानतंर तपासादरम्यान धक्कादायक समोर येत आहेत. भोंदू बाबाच्या आश्रमात पोलिसांना वेगवेगळ्या गोळ्यांची पाकिटे आढळून आली आहेत.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
आरोपी भोंदूबाबा प्रसाद हा भक्तांच्या मोबाइलमध्ये ‘हिडन ॲप’ डाऊनलोड करून भक्तांच्या खासगी क्षणांवर नजर ठेवत असे. याशिवाय, तो भक्तांना गुंगीचे औषध देऊन अश्लील चाळे करत होता. पोलिस तपासातून या कृत्याची झलक पाच वेगवेगळ्या भक्तांच्या चौकशीतून समोर आली आहे. समलैंगिक बाबा स्वतःला भक्तांचे दोष स्वतःवर घेतो, त्यांच्यावर संकट आहे, आणि त्यासाठी विशिष्ट उपाय करतो, अशी बतावणी करत असे. जर एखाद्या भक्ताने बाबाच्या कृतीला विरोध केल्यास बाबा मृत्यूची तारीख लिहून भीती दाखवत असे, असेही पोलिस तपासातून समोर आले आहे. त्यामुळेच, अनेक भक्त मानसिक दबावाखाली बाबाच्या सांगण्यानुसार वागत होते. त्यातच, आता पोलिस कोठडी संपत असताना पोलिसांनी आणखी सबळ पुरावे आढळून आले आहेत.
पोलिसांनी भोंदू बाबाच्या आश्रमातून 3 मोबाईल 2 ipad, सोलोपोशे 0.5md च्या गोळ्यांचे मोकळं पाकीट, प्रोव्हेनॉलच्या 9 गोळ्या, सिमकार्ड आणि पेन ड्राईव्ह हे साहित्य जप्त केले आहे. भोंदू बाबाकडील इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ क्लिप्स असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यासाठीच पोलिस हे सर्व साहित्य न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवणार असून त्यामध्ये नेमका कोणता डाटा आहे, याची माहिती घेणार आहेत. भोंदू बाबाकडे इतर वैद्यकीय औषधंही मिळाली आहेत. या औषधांचा नेमका वापर काय? याचीही तपासणी पोलिस करणार आहेत.
पुणे! भोंदूबाबाचे अश्लील चाळे; चिठ्ठीवर तारीख लिहायचा अन्…
पुणे! भोंदूबाबा निघाला समलैंगिक; पाहा पराक्रम…
पुणे! मोबाईल गरम झाला अन् भोंदूबाबाचं भलतंच कांड झालं उघड…
भोंदूबाबाने अल्पवयीन मुलींना नग्नावस्थेत पुजेला बसावे लागेल सांगून केले लैंगिक शोषण…
धक्कादायक! भोंदूबाबाने अंड्यातून काढला खिळा अन् मृतदेहाचा केला सौदा…
भोंदूबाबा महिलेला काही टेन्शन घेऊ नकोस असं म्हणाला अन् खोलीमध्ये गेल्यावर…
भोंदूबाबा व्यापाऱ्याला बंद खोलीत घेऊन गेले अन् शुद्धीवर आल्यावर बसला धक्का…
धक्कादायक! मूल होत नसल्याने भोंदूबाबासह दिराने केला सामूहिक बलात्कार…
भोंदूबाबाच्या खोलीच्या आत खोली; महिलांना तिथे बोलवायचा अन्…
पुणे शहरात भोंदू बाबा म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् अचानक…

