ऑफिस पार्टीत युवतीने केले मद्यसेवन अन् सहकाऱ्याने केला बलात्कार…

रायगड: युवती ऑफिस पार्टीसाठी अलिबागला आली असताना पार्टीत तिने मद्याचे सेवन केल्यानंतर ऑफिसमधील एका सहकाऱ्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, आरोपी अभिषेक सावडेकर याला अटक केली आहे.

मुंबईतील एका कंपनीने अलिबागमध्ये ऑफिस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला कंपनीत काम करणाऱ्या सर्वांना आमंत्रण देण्यात आले होते. घटनेच्या रात्री पीडित तरुणीने अलिबागमधील पार्टीत मद्यसेवन केले होते. दारुची नशा चढल्यानंतर ती हॉटेलमध्येच झोपी गेली. मात्र तिच्या नशेचा फायदा घेत अलिबाग तालुक्यातील मुशेत येथील अलास्का व्हिला मध्ये तिच्याच ग्रुप मेंबर सदस्याकडून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.

सकाळी जेव्हा ही युवती शुद्धीवर आली, तेव्हा ही बाब तिच्या लक्षात आली. या संदर्भात तिने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी अधिक तपास केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक युवक तिच्या रूममधून बाहेर आल्याचे निदर्शनास आले. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असता तपासादरम्यान या व्यक्तीने अत्याचाराची कबुली दिली. अभिषेक सावडेकर असं या आरोपीचे नाव असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

डॉक्टर शुभांगी वानखडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण…

पुणे! भोंदूबाबाच्या आश्रमातून वेगवेगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या जप्त…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

मुंबईत शिक्षिकेने विद्यार्थ्याला दारू पाजून करत राहिली लैंगिक अत्याचार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!