I-Phone, I-Pad, Smart Watch चोरणाऱ्यांना युनिट -2 ने केले जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): ब्लू डार्ट कंपनीच्या गाडीतून महागडे मोबाईल चोरणाऱ्या आरोपींना युनिट -2 ने 24 तासात जेरबंद केले असून, 3,90,445 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दिनांक 10/08/2023 रोजी रात्री सहकारनगर पोलिस स्टेशन गु र. क्र.193/2023 भादवि कलम 379 अन्वय ब्लू डार्ट एक्सप्रेस कुरिअर कंपनीचे मालवाहतुकी दरम्यान APPLE कंपनीचे I-PHONE, I-PAD व डिजिटल SMART WATCH असा 3,90, 445/-रु किमतीचा इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल चोरी झालेबाबत गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन युनिट-2 प्रभारी नंदकुमार बिडवई यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली युनिट 2 कडील सपोनि वैशाली भोसले पोलिस अंमलदार गजानन सोनुने, अमोल सरडे, पुष्पेन्द्र चव्हाण, साधना ताम्हणे, संजय जाधव, उत्तम तारू, विनोद चव्हाण, विजय पवार अशी टीम तयार करून तात्काळ आरोपींचा शोध घेणेबाबत आदेश दिले होते.

सपोनि वैशाली भोसले व वरील स्टाफ असे आरोपींचा युनिट 2 हद्दीत शोध घेत असताना, युनिट- 2 कडील पो. अंमलदार पुष्पेन्द्र चव्हाण व अमोल सरडे यांना बातमी मिळाली की दोन संशयित पद्मावती ट्रॅव्हल्स पार्किंग येथे चोरीचे महागडे फोन विक्रीसाठी आले असून ते ग्राहक शोधत आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने युनिट -2 कडील वरील टीम यांनी पद्मावती ट्रॅव्हल्स पार्किंग जवळ सापळा रचून शिताफीने
1) अभिजीत अरुण जाधव वय 26 वर्ष रा. मुकादमवाडी, कुरकुंभ, दौंड, पुणे
2) अक्षय संभाजी निंबाळकर, वय 23 वर्ष, रा.मु.पो. मळद, ता. दौंड जि. पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून किंमत 3,90,445/- रु चे 05 नग APPLE कंपनीचे I-PHONE, 01 APPLE कंपनीचा I-PAD, 03 नग डिजिटल SMART WATCH असा मुद्देमाल मिळून आला आला. त्यांनी दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याने, त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी सरकारनगर पोलिस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास सहकारनगर पोलिस स्टेशनकडील अधिकारी करीत आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे-1 सुनील तांबे , वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले, विशाल मोहिते, PSI राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे, पोलिस अंमलदार गजानन सोनुने, अमोल सरडे, पुष्पेन्द्र चव्हाण, साधना ताम्हाणे, उज्वल मोकाशी, उत्तम तारू, संजय जाधव, निखिल जाधव, विनोद चव्हाण, विजय पवार, मोसिन शेख, नामदेव रेणुसे, शंकर नेवसे, राहुल राजपुरे, नागनाथ राख या पथकाने केली आहे.

पुणे शहरात व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना युनिट २ने केले जेरबंद…

कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकून खंडणी मागणाऱ्यास Unit-2ने केले जेरबंद…

पुणे-नगर महामार्गावरून गुन्हे शाखा युनिट ६ ने दोघांना ताब्यात घेतले अन्…

पुणे शहरातील एका प्रसिद्ध पबमध्ये जोरदार राडा; बनावट नोटांची उधळण…

पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा मारेकरी अटकेत, हत्येचे कारणही समोर…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!