पुणे शहरात खुनाचा प्रयत्न करणारे पाच अटकेत; पाहा नावे…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या ०५ आरोपींना पर्वती पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

दिनांक ०५/०८/२०२३ रोजी रात्रौ १० /०० वा. चे सुमारास पानमहा वसाहत सिंहगड रोड येथे एका अल्पवयीन मुलाच्या खुनाचा प्रयत्न केल्याबाबत पर्वती पो.स्टे. येथे गु.र.नं. २३४ / २०२३ भा.द.वि. कलम ३०७, ३२६, १४३, १४७, १४८, १४९, ५०६, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) महा. पोलिस अधि. कलम ३७(१) सह १३५, प्रमाणे गुन्हा दाखल होता. दाखल गुन्हयांचा गंभीर प्रकार लक्षात घेवून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींचा शोध तात्काळ घणेकामी पर्वती पोलिसांना आदेशीत केले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे पर्वती पोलिस यांचे मार्गदर्शनाखाली पर्वती पोलिस ठाणेचे तपास पथकाचे प्रभारी सुनिल जगदाळे व तपास पथक कर्मचारी आरोपींचा शोध घेत होते.

पोलिस हवा. कुंदन शिंदे पोअं सद्दाम शेख, प्रकाश मरगजे यांना त्यांच्या खास बातमी दारामार्फतीने बातमी मिळाली की, गुन्हयांतील सहभागी आरोपी हे पुणे सातारा रोड लक्ष्मीनारायण टॉकिज शेजारील उड्डान पुलाखाली पर्वतीदर्शन येथील सार्वजनिक पर्किंगमध्ये कोठेतरी पळून जाण्याच्या तयारीत थांबलेले आहेत. अशी सदरची बातमी सर्व स्टाफने वरिष्ठांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली व्यवस्थीत सापळा रचला. आरोपी पळून जाण्यापुर्वी त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांची नावे
१) अरुण रोहिदास चंदनशिवे, वय. ४७ वर्षे, धंदा. रिक्षा ड्रायव्हर, सद्या रा. फ्लॅट नं.१०५/६ मॅपल रेसिडन्सी, धायरेश्वर मंदीरासमोर, धायरी, पुणे
२) अशोक रोहिदास चंदनशिवे, वय ४८ वर्षे, धंदा पानटपरी, सद्या रा. फ्लॅट नं.१०५/६मॅपल रेसिडन्सी, धायरेश्वर मंदीरासमोर, धायरी पुणे
३) विकी कुमार चंदनशिवे ऊर्फ राज वय – ३२ वर्षे, धंदा- काहीनाही, सद्या रा. मयुर अपार्टमेंन्ट फ्लॅट नं. १०२ बेनकरवस्ती, धायरी पुणे
४) कुणाल कृष्णा सावंत वय- २४ वर्षे, धंदा- नोकरी, सद्या रा. खेडकर कॉर्नर मराठा हॉटेल मागे, साईशांती अॅव्हेन्यु फ्लॅट नं.४०७ नन्हे, पुणे
५) प्रसिक ऊर्फ रणजित उत्तम कांबळे वय – ३२ वर्षे, धंदा- नोकरी रा. सर्वे नं. १३१/१ पानमळा वसाहत, सिंहगड रोड पुणे अशी असल्याचे सांगितले.

सदर अल्पवयीन फिर्यादी मुलगा त्याच्या मामाच्या १० वर्षापुर्वीच्या खुनातुन अशोक व अरुण चंदनशिवे यांची सुमारे ०६ वर्षापुर्वी निर्दोष सुटका झाल्याने याचा राग येवुन सदर अल्पवयीन फिर्यादी हा आरोपीच्या नातेवाईकांना त्रास देत असल्याचा संशय आल्याने त्या रागातुन आरोपींनी सदर गुन्हा केल्याचे सांगितले. त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांना नमुद गुन्हयांत अटक करण्यात आली आहे. गुन्हयांत आणखीण कोण सामील आहे काय आणि गुन्हयांचा मुळ उद्देश काय होता. याचा सखोल तपास पर्वती पोलिस ठाणे कडील पोलिस उप निरीक्षक सुनिल जगदाळे हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, प्रविण पाटील, पोलिस उप-आयुक्त सो परि. ३ सुहैल शर्मा, सहा. पोलिस आयुक्त सिंहगड विभाग आप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे व पोलिस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस उप-निरीक्षक सुनिल जगदाळे, पो. हवा. कुंदन शिंदे, पो. अं. प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, सद्दाम शेख, दयानंद तेलंगे-पाटील, नवनाथ भोसले, प्रमोद भोसले, प्रशांत शिंदे, अनिस तांबोळी, पुरुषोत्तम गुन्ला, किशोर वळे, अमित चिव्हे व अमोल दबडे यांनी केली आहे.

पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…

पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी घडामोड; वाहनात आढळला शस्त्रसाठा…

पुणे विमानतळावर वृद्ध महिलेने बॉम्ब अफवा पसरवून उडवली धावपळ…

पुणे शहरात व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना युनिट २ने केले जेरबंद…

प्रेमसंबंधात अडथळा! पुणे शहरात वेबसिरिज पाहून केला खून अन् मृतदेह…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!