पिंपरी-चिंचवडमध्ये दोन पिस्टलांसह सराईत गुन्हेगारांना अटक…

पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे शाखा युनिट २ने कारवाई करत दोन पिस्टलांसह सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम त्यांचे अधिपत्याखाली ०९/११/२०२३ रोजी पोलिस अधिकारी व अंमलदारांसह पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणा-या गुन्हेगारांची माहिती घेत होते. पोनि कदम यांना बातमीदाराकरवी बातमी मिळाली कि, दोन सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार कमरेला पिस्टल लावून दापोडी परिसरात फिरत आहेत. गुन्हे शाखा पोलिस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलिस आयुक्त सतिश माने यांना याबाबतची माहिती कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार करुन सदर पथकाला सुचना व मार्गदर्शन करुन तात्काळ दापोडी भागात रवाना केले.

संशयितांचा शोध घेतला असता सदर गुन्हेगार हे फुगेवाडी अल्फा लावल कंपनीजवळ थांबले असल्याची माहिती काढुन त्या परिसरात सापळा लावला. बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाचे कंपनीच्या भिंतीलगत बोलत थांबले असल्याचे पोलिस पथकाचे निदर्शनास आले. त्याचवेळी सदर संशयित हे पळून जाण्याची तयारी करीत असताना पोलिस पथकाने अत्यंत शिताफीने त्यांना पकडले.
१) मुनाफ रियाज पठाण (वय २७ वर्षे, रा. नानापेठ पुणे) व २) देविदास उर्फ देवा बाळासाहेब गालफाडे (वय २७ वर्षे रा. कळसमाळवाडी रामगडवस्ती विश्रांतवाडी पुणे) अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्या अंगझडतीमध्ये कमरेला लावलेली दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली.

मुनाफ रियाज पठाण व देविदास उर्फ देवा बाळासाहेब गालफाडे हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचा पिस्टल जवळ बाळगण्याचा नक्की काय उदेश होता, पिस्टल हत्यार नक्की कोठून व कोणत्या कारणासाठी आणले, पिस्टल हत्यार कोणाला विक्री करणेसाठी आले होते का याबाबत सखोल तपास गुन्हे शाखेकडून करुन आरोपींचे विरुध्द गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस कॉस्टेबल बक्कल नंबर १९२० अजित आण्णा सानप यांची सरकार तर्फे भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे फिर्याद घेवून भोसरी पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस संजय शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक डॉ. आयुक्त पोलिस आयुक्त गुन्हे सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप निरीक्षक, पोलिस अंमलदार दिलीप चौधरी, उषा दळे, देवा राऊत, नामदेव कापसे, आतिष कुडके, विपुल जाधव, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई; ३ पिस्टल जप्त…

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तिघींची सुटका…

पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत ३१ किलो गांजाचा मोठा साठा जप्त…

पिंपरी-चिंचवडच्या पोलिसकाकाने जिंकले दीड कोटी रुपये; पण…

पिंपरी-चिंचवडमध्ये लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!