संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

अमरावती: महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे संभाजी भिंडे यांच्या या वक्तव्याप्रकरणात काँग्रेस देखील चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळे आता भिडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

अमरावतीमध्ये संभाजी भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी महात्त्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. काँग्रेसने हा मुद्दा आक्रमकपणे उचलून धरला होता. या प्रकरणात काँग्रेसचे प्रदेश सचिव नंदकिशोर कृती यांनी राजपेठ पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आज सकाळी संभाजी भिडे आणि कार्यक्रमाचे आयोजक निशांत जोध यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर आणि माजी मंत्री सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राजकमल चौकात आंदोलन करण्यात आले आहे.

‘पिस्तुल्याभाई’ला पोलिसांनी शिकवला धडा; गुन्हा दाखल…

पुण्यातून कोकणात फिरायला जाताना कार धरणात बुडाली; युवतीसह तिघांचा मृत्यू

बुलढाण्यात दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक; सात ठार; पोलिसांची माणुसकीचे दर्शन…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!