पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याचा राग; मुलाच्या वडिलांनाच संपवले…

पुणेः बहिणीला पळवून नेल्याच्या संशयातून प्रेयसीच्या भावाने प्रियकरांच्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. कटाळू कचरू लहाडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. येरवडा भागात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवतीचा भाऊ इस्माईल शेख (वय 25) याला ताब्यात घेतले आहे.

लहाडे व शेख कुटुंबीय यांचे एकाच परिसरात वास्तव्यास आहे. कटाळू यांचा मुलगा आणि इस्माईल याची बहिण या दोघांमध्ये मैत्री होती. कटाळू यांचा मुलगा व संबंधित युवती आज सकाळी घरातून निघून गेले. बहिणीला कटाळू यांच्या मुलानेच पळवून नेल्याचा संशय इस्माईल याला आला. त्या रागातूनच आज कटाळू याच्यावर इस्माईल याने रागातून धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने बहिणीला फूस लावून पळवून नेऊन आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागतून मुलीच्या भावाने टोकाचे पाऊल उचलले आहे. कटाळू लहाडे उभे असताना दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने लहाडे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये लहाडे यांच्या डोक्याला आणि हातावर वार केल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. मृत लहाडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: पुणे पब ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई…

पुणे शहरात कोयता गँगने धुमाकूळ घालत केली वाहनांची तोडफोड…

पुणे शहरात रिलसाठी जीवघेणा स्टंट करणाऱ्यांची नावे आली समोर…

पुणे शहरात घरातून निघून महिलेचा पाण्याच्या टँकरमध्ये आढळला मृतदेह…

पुणे शहरात पत्नीला लॉजवर घेऊन गेला अन् घात केला…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!