माझ्या सोबत रिलेशन मध्ये राहणार का नाही? म्हणणारा जेरबंद…

सहकारनगर पोलिसांनी सराईत गुंडास कोयत्यासह केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे):
पुणे शहरात पीडित मुलीची छेड काढण्याच्या गुन्हयातील फरारी सराईत गुंडास कोयत्यासह सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

गुलमोहर अपार्टमेंट बालाजीनगर धनकवडी पुणे येथे पीडित मुलगी हिचे ३०/११/२०२३ रोजी रात्रौ १२.३० वा सुमारास घराचे दार वाजवुन “तु मला आवडतेस, तु माझ्या सोबत रिलेशन मध्ये रहा” असे म्हणला असता फिर्यादी यांनी माझा हात सोड असे म्हणुन ओरडले असता त्याने हात पकडुन मारहाण केली. २७/१२/२०२३ रोजी फिर्यादी यांना पुन्हा रस्त्यात आडवुन तु माझ्या सोबत रिलेशन मध्ये राहणार का नाही” असे विचारता नकार दिल्याने “तुला व तुझा घरच्यांना बघुन घेतो” अशी धमकी देवुन विनयभंग केला होता. त्याबाबत आशीष उर्फ पंप्या श्रीकृष्ण राख (वय १९ वर्षे रा. दत्त कृपा सोसायटी खुशबु हॉटेल मागे बालाजीनगर धनकवडी पुणे) याचे वर सहकारनगर पोलिस ठाणे येथे गुरनं ३५५ / २०२३ भा.द.वि. कलम ३५४,३२३,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा करुन आरोपी फरारी होता.

०२/०१/२०२४ रोजी सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार असे सहकारनगर पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलिस अंमलदार अमोल पवार व निलेश शिवतरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर बालाजीनगर येथे मुलीच्या छेडछाडीच्या गुन्हयांत फरार असलेला आरोपी पंप्या उर्फ आशीष राख हा कोयता सारखे हत्यार घेवून राज लॉन्ड्रीचे पुढे सार्वजनीक रोडवर बालाजीनगर धनकवडी पुणे येथे काहीतरी गुन्हा करण्याच्या इरादयाने थांबला आहे, अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहकारनगर पोलिस स्टेशन कडील वरिष्ठांना कळविली असता त्यांनी लागलीच पो उपनिरी. राहुल खंडाळे व अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश
दिले.

सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपीस ताब्यात घेवून नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव आशीष उर्फ पंप्या श्रीकृष्ण राख (वय १९ वर्षे रा. दत्त कृपा सोसायटी पहीला मजला फ्लॅट नं. ११ (के/ऑफ महेश शिंदे) गणेश मंदीरा जवळ गुरुदत्त सोसायटी खुशबु हॉटेल मागे बालाजीनगर धनकवडी पुणे असे सांगितले. त्याची झडती घेता त्याचे कंबरेला एक लोखंडी कोयता मिळून आल्याने त्याच्यावर सहकारनगर पोलिस ठाणे येथे गुरनं ०३ / २०२४ भारतीय हत्यारबंदी कायदा कलम ४ सह २५, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याच्याकडे सहकारनगर पोलिस ठाणे गुरनं ३५५ / २०२३ भा.द.वि. कलम ३५४,३२३, ५०६ दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वसात घेवुन चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा त्याने केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी वर खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे अशा प्रकारचे एकुण ०२ गुन्हे बिबवेवाडी पोलिस स्टेशन येथे दाखल आहेत.

सदरची कामगीरी अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ – २, स्मार्तना पाटील, सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, संदीप देशमाने पोलिस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहा.पोउपनिरी बापु खुटवड, पोलिस अंगलदार अमोल पवार, निलेश शिवतारे, बजरंग पवार,सुशांत फरांदे, भुजंग इंगळे, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, विशाल वाघ, सागर कुंभार,सागर सुतकर यांनी केली आहे.

kashmir
kashmir

सहकारनगर पोलिसांनी पीएमटीमध्ये चोरी करणाऱ्यास शिताफीने केली अटक…

सहकारनगर पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला केले जेरबंद…

सहकारनगर पोलिसांनी दोन सराईत गुंडांना केले जेरबंद…

पुणे शहरात खुनी हल्ला करणाऱ्यांना पर्वती पोलिसांनी केले जेरबंद…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 75वी एमपीडीएची कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!