
पुणे सीआयडीचा अपर पोलिस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे याला अटक…
सातारा : पुणे सीआयडीचा अपर पोलिस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे याला एक कोटी पाच लाख रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दारू परवाना मिळवून देण्याचा बहाना करून फसवणूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी श्रीकांत कोल्हापुरेला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. महाबळेश्वरातील हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली होती.
महाबळेश्वरातील हॉटेल व्यावसायिक हनमंत साळवी यांना दारु विक्रीचा परवाना देतो, असे सांगून सुमारे एक कोटी पाच लाखाला फसवल्याचे उघडकीस आले आहे. या बाबत साळवी यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने सीआयडी विभागाचे अपर पोलिस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे याला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना साताऱ्यातील वाई न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
श्रीकांत कोल्हापुरे याने दारु विक्रीचा परवाना अडीच कोटी रुपयांमध्ये देण्याचे कबुल केले होते. टप्प्या टप्याने साळवी यांनी कोल्हापुरे यंना एक कोटी पाच लाख रोख आणि धनादेशाद्वारे दिले होते. यात मध्यस्थी असलेले सुमारे कोल्हापुरेसह नऊ जण होते. दारु परवाना मिळणार नाही, यात आपली फसवणूक झाली आहे असे समजल्यानंतर साळवी यांनी याबाबतची तक्रार अपर पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने कोल्हापुर परिक्षेत्राचे पोलिस अधिक्षक मनिषा दुबुले यांनी तपास करुन श्रीकांत कोल्हापुरे याच्यासह नऊ जणांवर जुलैमध्ये गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यात कोल्हापुरे याचा प्रत्यक्ष संबध आल्याचे तपासात समोर आले होते. यातील यापुर्वी हनुमंत मुंडे, अभिमन्यु देडगे आणि बाळू पुरी या तिघांना अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी कोल्हापुरे हा पळून गेला होता. नाशिक- मुंबई रोडवरील ठाण्यातील खटवली टोलनाक्यावर याला पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले होते.
दरम्यान, श्रीकांत कोल्हापुरे हा मुळचा कोल्हापुर जिल्ह्यातील असून सध्या तो पुणे येथे राहत आहे. त्याला अटक केल्यानंतर आता पोलिसांनी त्याच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
पोलिस चौकीमध्ये जुगार खेळणं अन् सिगारेट ओढणं पडलं महागात…
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…
राज्यातील 420 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा नावे…
राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

